



ग्रंथालय
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वा.गो.आपटे संदर्भ संशोधन ग्रंथालय
ग्रंथालय
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने कै.वा.गो.आपटे यांच्या नावाने, संदर्भ संशोधन ग्रंथालय चालविले जाते. ग्रंथालयात रुढ वाङ्मयप्रकारांबरोबरच संदर्भ ग्रंथ तसेच दुर्मिळ ग्रंथ ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
मराठी भाषेच्या अभ्यासकांना, जिज्ञासूंना तसेचं सर्वसामान्य वाचकांना या ग्रंथालयाचा त्यामुळे मोठा फायदा होत आहे. ग्रंथालयात ५० हजारांहून अधिक पुस्तके असून ग्रंथालयाच्या सभासदांची संख्या १९७५ एवढी आहे.
दिवासाला किमान १०० ते १२५ वाचक ग्रंथालयाचा लाभ घेतात. सर्व महत्त्वाची नियतकालिके, वर्तमानपत्रे ग्रंथालयात वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
ग्रंथालय सुविधेसंबंधी
-
परिषदेचे आजीव सदस्य असलेल्यांनाच ग्रंथालयाचे सभासद होता येते. सदस्य नसलेल्यांना ग्रंथालयात बसून नाममात्र शुल्कात पुस्तके वाचण्याची सोय करण्यात आली आहे.
-
एका पुस्तकासाठी २०० रुपये अनामत रक्कम असून १५० रुपये वार्षिक वर्गणी आहे तर दोन पुस्तकांसाठी ४०० रुपये अनामत रक्कम असून ३०० रुपये वार्षिक वर्गणी आहे.
-
एकावेळी सभासदांना जास्तीत जास्त दोन पुस्तके व एक नियतकालिक वाचनासाठी घेऊन जाता येते.
-
पुस्तके परत करण्याचा कालावधी १५ दिवसांचा असून त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाला १ रुपया दंड आकारला जातो.
ग्रंथालयाच्या सभासदांसाठी दरवर्षी दिवाळी अंक योजना राबविली जाते.
परिषदेच्या ग्रंथालयासाठी दरवर्षी नवीन ग्रंथांची खरेदी केली जाते. त्याचबरोबर काही ग्रंथ भेटीदाखलही येत असतात. ग्रंथालयात जास्तीची असलेली पुस्तके परिषदेच्या विविध शाखांच्या ग्रंथांलयांना भेटीदाखल दिली जातात.
ग्रंथालयीन व्यवस्थापन
१. मीनाक्षी केळकर - ग्रंथपाल
२. सौ. शोभना कुलकर्णी - ग्रंथपाल
३. विमल अहिरे - ग्रंथपाल
४. सौ. वर्षा डाळिंबकर - ग्रंथपाल
५. शिवाजी पाळंदे - सेवक
वेळ: सकाळी ९.३० ते दुपारी १२ वा. आणि सायं. ५ ते ७:३० वा.