

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११० वा वर्धापनदिन
समारंभ २६ आणि २७ मे २०१६ मातृसंस्थेची शतकोत्तर दशकपूर्ती: प्रा. मिलिंद जोशी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि समीक्षा यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम ही संस्था गेली ११० वर्षे करते आहे. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात मिळून संस्थेच्या ७० शाखा आहेत.