

मसाप आणि विश्वकोश निर्मिती मंडळात सामंजस्य करार- मसापला ज्ञानमंडळ म्हणून मान्यता
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने आपल्या कामासाठी विविध विद्यापीठे व शैक्षणिक, संशोधन संस्था यांच्या सहयोगातून विविध विषयावरील ज्ञानमंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेची साहित्य या विषयावरील ज्ञानमंडळ म्हणून निवड केली. त्या संदर्भातला सामंजस्य करार झाला. या करारावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सचिव सुवर्णा पवार यांनी स्वाक्षर्या


मराठी वाङमयाचा इतिहास आता ई-बुक आणि मोबाईल ई-बुक रूपात
तंत्रस्नेही वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी 'मसाप' चा पुढाकार महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङमयाचा इतिहास सात खंडात प्रकाशित केला आहे. १९८४ साली या प्रकल्पाची सुरुवात झाली. असा प्रकल्प राबविणारी मसाप ही महाराष्ट्रातील एकमेव साहित्य संस्था आहे. शं. गो. तुळपुळे, स. गं. मालशे, रा. श्री. जोग, गो. म. कुलकर्णी, व. दि. कुलकर्णी, प्रा. रा. ग. जाधव यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडाचे संपादन केले आहे. हे वाङमय इतिहासाचे सर्व खंड आता तंत्र


साहित्य परिषद आता होणार ई – अॅक्टीव्ह
पुणे : साहित्यातील मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने आता बदलत्या काळाची गरज ओळखून ई-साधनांचा अधिकाधिक वापर करून कार्यरत राहण्याचे ठरविले आहे. तरूणाईला आणि आजच्या आधुनिक पिढीला मसापशी जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम नव्या कार्यकारी मंडळाने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून साहित्य परिषदेचे www.masapapune.org हे संकेतस्थळ पुनर्निर्मिती करून अद्ययावत करण्यात आले आहे. या संकेत स्थळाद्वारे साहित्यप्रेमी ई - साधनांद्वारे द्वारे साहित्य परिषदेशी संपर्क साधू शकण