

तुम्ही बदला; जग बदलेल! मसापच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात राजीव तांबेनी दिला मुलां
पुणे : आपल्याला बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते. कृती बदलायची असेल तर विचार बदला. विचार बदलायचे असतील भाषा बदला. भाषा बदलायची असेल तर मानसिकता बदला. तुम्ही बदला म्हणजे जग बदलेल. असा मंत्र साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी विद्यार्थ्यांना दिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमांतर्गत ते भावे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष


कादंबरी लेखनामागचे धगधगते अनुभव : प्रा. व. बा. बोधे
कादंबरी लेखनामागचे धगधगते अनुभव सांगत आपल्या अस्खलीत वाणीचा साक्षात्कार प्रसिद्ध ग्रामीण कादंबरीकार प्रा. व. बा. बोधे यांचे व्याख्यान रंगले. निमित्त होते कै. वामन मल्हार जोशी यांच्या स्मृतिदिनाचे यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यवाह दीपक करंदीकर यांनी केले. यावेळी प्रमोद आडकर, उद्धव कानडे, बंडा जोशी व डॉ.अरविंद संगमनेकर उपस्थित होते.


साहित्य परिषदेत रंगली मैफल नवी: एक कवयित्री एक कवी
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने एक कवयित्री एक कवी हा नवीन कार्यक्रम सुरू झाला आहे. प्रारंभीच्या या आगळ्या वेगळ्या मैफिलीचा मान प्रसिद्ध कवी वसंत आबाजी डहाके आणि प्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर यांना देण्यात आला. ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलीमा गुंडी यांनी कवी आणि कवयित्रीशी संवाद साधला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन स


"अभंग रचनांच्या गायनामुळे साहित्य परिषदेचे वातावरण भक्तिमय "
आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा यांचे औचित्य साधुन कै. श्रीराम साठे यांनी स्थापन केलेल्या श्रद्धा भक्ती मंडळाचा एका जनार्दनी हा वारकरी संप्रदायानुसार भजनी परंपरेचा भक्तिगीतांच्या सादरीकरणाने महाराष्ट्र साहित्य परिषेदेचे वातावरण संगीतमय झाले. साहील पुंडलिक, रवींद्र काशीकर, अनुजा पंडीत, राजन चक्के, पटवर्धन व सहकलाकार यांनी या कार्यक्रमात सर्व संतांच्या अनेक भक्तिरचना सादर केल्या. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंदीकर, प्रमोद आडकर, बंडा जोशी, उद्धव कानडे, डॉ.


पुण्यात पाहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन लवकरच होणार
पुण्यात पाहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन लवकरच होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सुरजितसिंग पाथर यांची नुकतीच निवड झाली. यानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात त्यांचा पांडुरंगाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी डावीकडून संजय नहार, संतसिंग मोखा, प्रकाश पायगुडे, श्रीपाल सबनीस, पद्मश्री डॉ. सुरजितसिंग पाथर, महापौर प्रशांत जगताप, प्रा. मिलिंद जोशी, भारत देसडला.


'मसाप गप्पा' - मसाप मध्ये रंगल्या डॉ. अनिल अवचट यांच्याबरोबर गप्पा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मसाप गप्पा या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांच्याशी लेखिका उमा कुलकर्णी यांनी संवाद साधला. या गप्पा उत्तरोत्तर रंगत गेल्या. साहित्य क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, यावेळी उपस्थित होते. कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत तथा मामा दांडेकर पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने तत्त्वज्ञान, अध्यात्मशास्त्र, मानसशास्त्र, योग किंवा नीती या विषयांशी संबंधित उत्कृष्ट ग्रंथास 'डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत तथा मामा दांडेकर पुरस्कार' प्रतिवर्षी दिला जातो. यावर्षी शकुंतला आठवले यांच्या 'भारतीय तत्त्वविचार' (काँटिनेंटल प्रकाशन) या ग्रंथास हा पुरस्कार मसापचे कार्यकारी विश्वस्त मा. उल्हासदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या समारंभाच्या अध्


"सन्मान साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त विजेत्यांचा"
ज्येष्ठ साहित्यिक राजीव तांबे यांना मराठी बालसाहित्याच्या प्रांतात दिलेल्या मौलिक योगदानाबद्दल साहित्य अकादमीचा बालसाहित्यासाठीचा पुरस्कार जाहीर झाला तसेच युवा लेखिका, नाटककार मनस्विनी लता रवींद्र यांना 'ब्लॉगच्या आरश्यापल्याड' या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे त्यांचा मा. भानू काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून प्रकाश पायगुडे, राजीव तांबे, मनस्विनी लता रवींद्र, भानू काळे, प्रा. मिलिंद जोशी, सुनीता


मसापतर्फे मराठी प्रकाशक परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते सत
मसापतर्फे मराठी प्रकाशक परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी डावीकडून मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, प्रकाशक परिषदेचे कार्यवाह रमेश राठिवडेकर, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, प्रा. द. मा. मिरासदार, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाशक परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार.