

'आपले सांस्कृतिक संचित हा महान ऊर्जास्रोत' : डॉ. सरोजा भाटे राजेंद्र खेर यांना युगंधर सन्मा
पुणे : आपले सांस्कृतिक संचित हा महान ऊर्जास्रोत आहे. तो मागून मिळत नाही. तो अनादी काळापासून वाहत आला आहे. त्याचा वापर काही लेखकांनी समर्थपणे केला आणि त्यातून चिरंतन कलाकृती निर्माण झाल्या. असे मत संस्कृतच्या व्यासंगी अभ्यासक डॉ. सरोजा भाटे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शिवाजी सावंत मित्र मंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध कादंबरीकार राजेंद्र खेर यांना युगंधर सन्मान डॉ. सरोजा भाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत
मसाप शाखाही करणार 'अभिजात'साठी जागर
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची २०१६-१७ या वर्षातील तिसरी सभा आज माधवराव पटवर्धन सभागृहात कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाखांनीही आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचे अभियान राबवावे असा निर्णय घेण्यात आला मसापचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव, नंदुरबार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, या जिल्ह्यात मसापच्या


'अभिजात' दर्जासाठी साहित्यिकांची एकजूट मसापच्या पुढाकाराने बैठक : पंतप्रधानांना निवेदन द
पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारने तात्काळ कार्यवाही करावी या आग्रही मागणीसाठी शुक्रवारी (२६ ऑगस्ट २०१६) साहित्य परिषदेत साहित्यिकांची बैठक झाली. मसापच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, अभिजात समितीचे सदस्य हरी नरके, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, मसापचे पूर्वाध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. अविनाश सांगोल


"राजेंद्र खेर यांना युगंधर सन्मान"
पुणे : 'मृत्युंजय' कार शिवाजी सावंत यांच्या ७६ व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शिवाजी सावंत मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट रोजी आठवणीतील शिवाजी सावंत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध कादंबरीकार राजेंद्र खेर यांना युगंधर सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या सन्मानाचे स्वरूप आहे. संस्कृतच्या व्यासंगी अभ्यासक डॉ. सरोजा भाटे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. य


न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रविण दवणे यांची गप्पांची मैफल रंगली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात सहभाग जगातली सगळीच घड्याळे फेकून देऊन अरबी समुद्रात, आम्ही शिरलो पुस्तकांच्या जगात !
रंगीत चित्रांच्या बागेतून,
सहज भिजलो कवितेच्या कारंज्यातून अशा आपल्या कविता खास शैलीत ऐकवत, गोष्टी सांगत प्रसिद्ध कवी प्रविण दवणे यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गप्पांची मैफल रंगवली. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमाचे. त्यात प्रविण दवणे सहभागी होऊन संवाद साधत होते.
यावेळी


शौर्य आणि क्रौर्य यात भेदच राहिला नाही 'मसाप गप्पा' कार्यक्रमात विद्या बाळ यांची खंत
पुणे : बलात्काराचा कायदा कठोर झाल्यामुळे गुन्हा सिद्ध झाला तर जबर शिक्षा होईल या भीतीने बलात्काराबरोबरच कौर्याच्या घटना वाढत आहेत. प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करतानाही लाथा बुक्क्या मारल्या जातात, यासारख्या गोष्टीमागे मर्दानगीचा खोटा अहंकार आहे. समाजातली असहिष्णुता वाढते आहे. अहिंसा म्हणजे षंढत्व अशी जी समाजाची मानसिकता झाली आहे, ती बदलणे गरजेचे आहे. शौर्य आणि क्रौर्य यात भेदच राहिला नाही अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य


वाङ्मयीन संस्थांचे सामाजिक व्यवहारामध्ये महत्वाचे स्थान आहे : डॉ. सदानंद मोरे
वाङ्मयीन संस्थांचे व्यवहार हे सामाजिक दृष्टया अतिशय महत्वाचे असतात. असे संस्थात्मक काम किती महत्वाचे आहे याची जाणीव कै. डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या साहित्य परिषदेतील कार्यकर्तृत्वामधुन दिसून येते. सर्वांना बरोबर घेऊन, माणसांमधले गुण हेरून त्यांनी संस्थेला पुढे नेले. असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद व जोगळेकर परिवाराच्या वतीने दिला जाणारा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक


निधनवार्ता
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्येष्ठ सेवक श्री. चंद्रशेखर केळकर यांचे आज दिनांक १२ ऑगस्ट २०१६ रोजी, सकाळी अल्पशा आजाराने वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत गेली १५ वर्ष ते सेवक म्हणुन काम करत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


"डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार प्रा. विलास खोले यांना जाहिर"
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जेष्ठ समीक्षक व व्यासंगी प्राध्यापक डॉ. विलास खोले यांना जाहिर झाला आहे. दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. बुधवार दि. १७ ऑगस्ट २०१६ रोजी सायं. ६.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा पुरस्कार डॉ. विलास खोले यांना प्रदान करण्यात येणार आह


सौंदर्यसाधना ही आता फक्त श्रीमंतांची मिरासदारी नाही : डॉ. मधुसूदन झंवर
सौंदर्यसाधना ही आता फक्त श्रीमंतांची मिरासदारी नाही तर जनसामान्यांमध्ये या विषयी जागृती येत आहे म्हणूनच सर्वांगिण सौन्दर्यसाधनेविषयी परिपूर्ण माहिती ही काळाची गरज आहे, ही गरज पूर्ण करणारे हे पुस्तक म्हणूनच अतिशय मोलाचे आहे, असे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांनी सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, डॉ. शकुंतला क्षीरसागर पुरस्कृत कै. विलास शंकर रानडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभात ते बोलत होते. वैद्यक क्षेत्रासाठीचा हा पुरस्कार ' डॉक्टर, मला सुंदर