"मसाप आणि मैत्र युवा फौंडेशनतर्फे वंचित मुलांसाठी अक्षरदिवाळी"
पुणे :- महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मैत्र युवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर २०१६ रोजी ११. १५ वा. वंचित मुलांसाठी 'अक्षर दिवाळी' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वंचित मुलांना वाचनप्रवृत्त करण्यासाठी पुस्तकाच्या रूपाने मसापतर्फे अक्षरफराळ प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते दिला जाणार आहे. हा समारंभ मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. या समारंभाला मैत्र युवा फौंडेशनचे संकेत देशपांडे, परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुड


प्रत्येक गावचा इतिहास 'गॅझेटिअर' व्हावा : डॉ. सदाशिव शिवदे
मसाप मध्ये डॉ. आनंद दामले यांना कै. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुरस्कार प्रदान पुणे : आज अनेक गावचा इतिहास लिहिणे गरजेचे आहे. कारण गावातील अनेक गोष्टी लुप्त होत आहेत. सणउत्सव दिसत नाहीत. माणसे एकमेकांपासून दुरावत आहेत. पूर्वजांचा इतिहास आपण लिहिला तर आजसुद्धा हा जिव्हाळा, प्रेम आनंद निर्माण करता येईल. प्रत्येक गावचा इतिहास 'गॅझेटिअर' होणे गरजेचे आहे. हे लेखन तेथील ग्रामपंचायतीने प्रसिद्ध करावे. असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र


'कवितांच्या प्रतिमांची कालानुरूप चिकित्सा करावी लागते : डॉ. नीलिमा गुंडी' 'मसाप मध्ये,
पुणे : दुर्गा ही भारतीय मनात रुजलेली एक सांस्कृतिक प्रतिमा आहे. संस्कृतीच्या वाटचालीत समूहमनाला आधार देण्यासाठी प्रतिमांची निर्मिती घडत असते या प्रतिमांमधला आशय महत्वाचा असतो. अतिशय कठीण असे उद्धिष्ट जिने स्वबळावर कठोर साधनेच्या साहाय्याने प्राप्त केले. ती शक्ती म्हणजे दुर्गा आज सर्व स्त्रियांसाठी स्त्रीपुरुष समता, स्वातंत्र्य आणि न्याय प्राप्त करणे, हे उद्धिष्ट आपल्यासमोर आहे, या उध्दिष्टापर्यंतचा प्रवास खडतरच आहे. त्यासाठी आत्मबळ मिळवायला या प्रतिमेकडून प्रेरणा मिळू शकते.