

नाटककार सावरकर हा सावरकरांचा पैलू उपेक्षितच :- ज्येष्ठ लेखक श्यामसुंदर मुळे
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. नाटककार हा त्यांचा एक पैलू होता. दुर्दैवाने त्यांचा हा पैलू उपेक्षित राहिला. याबाबतीत त्यांचे संस्कृत नाटककार भवभुती य़ांच्याशी साम्य अाढळते. भवभूतीला ज्याप्रमाणे मरणोत्तर कीर्ती मिळाली त्याप्रमाणेच नाटककार स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करावे, असे मत ज्येष्ठ लेखक श्यामसुंदर मुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सावरकरांच्या पु


"जगण्यातून सहज उमलते ती कविता प्रभावी" : डॉ. मनोहर जाधव 'मसाप' चा कुसुमाग्रज पुरस
निमशहरीकरणामुळे खेड्यापाड्यात शेतीमातीच्या आणि कुटुंबव्यवस्थेमधे अनेक समस्या आणि आव्हानं उभी आहेत. त्या जगण्यामधलं आंतरिक द्वंद्व आणि विरोधाभास, संवेदनशीलतेन टिपून स्वतंत्र जगणं शब्दबद्ध करणारी आजची समकालीन कविता अस्वस्थ करते. 'आपल्या जगण्यातून भोगण्यातून सहज उमलते तीच कविता शब्दातून प्रभावीपणे उमटते', असे मत साहित्यिक आणि समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुरस्कृत कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार कवी विष्णू थोरे आण


"मसाप गप्पा" मध्ये डॉ. अरुणा ढेरे यांच्याशी संवाद
सोमवार, दि. ०६ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६. १५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री डॉ. अरुणा ढेरे सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी लेखिका नीलिमा बोरवणकर संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात वयाची ६० वर्ष पूर्ण केल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.


कवी विष्णु थोरे यांना कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने दरवर्षी एका कवितासंग्रहाला कॉंटिनेंटल प्रकाशन पुरस्कृत कै. कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार, कवी विष्णू थोरे (चांदवड, जि. नाशिक) यांच्या 'धूळपेरा उसवता' या कवितासंग्रहाला दिला जाणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा संग्रह प्रकाशित करणाऱ्या नाशिकच्या अक्षरबंध प्रकाशनाचे, प्रवीण जोंधळे यांनाही पुरस्कार दिला जाणार आहे, कवी स्वप्नील पोरे आणि प्रकाश घोडके यांच्या निवड समितीने या कव


"नवोदित कवींनी साहित्य लेखनासाठी भाषेचा अभ्यास करावा" : अरुण म्हात्रे
नवोदित कवींनी साहित्य लेखनासाठी भाषेचा अभ्यास करावा आणि पूर्वसुरींच्या वाङमयाचा डोळस व्यासंग करणं आवश्यक आहे आणि अल्पाक्षरी हा काव्याचा गुण आत्मसात करायला हवा. असे प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने नवोदित कवींना देण्यात येणाऱ्या, कै. सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवी अरुण म्हात्रे, पुरस्कार प्राप्त कवी अभिजित थिटे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायग
'मूल्यभानाची सामग्री' या ग्रंथाला रा. श्री. जोग समीक्षा पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, दरवर्षी प्रख्यात समीक्षक कै. रा. श्री. जोग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, एका समीक्षा ग्रंथाला, विशेष पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी, ज्येष्ठ समीक्षक हरिश्चंद्र थोरात यांच्या 'मूल्यभानाची सामग्री' या समीक्षा ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. ग्रंथाचे प्रकाशक म्हणून शब्द प्रकाशन, मुंबईचे येशू पाटील यांनाही हा पुरस्कार दिला जाणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. मंदा खांडगे आणि डॉ. रेखा इनामदार-साने यां


'मसाप' च्या युवा साहित्य - नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी संदीप खरे' २५ आणि २६ फेब्रुवारील
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा रत्नागिरी आणि अ. भा. मराठी नाट्यपरिषद रत्नागिरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा साहित्य नाट्य संमेलन २५ आणि २६ फेब्रुवारीला रत्नागिरीला होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची निवड करण्यात आली आहे. किरण सामंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण उच्च आणि तंत्रशिक्षण राज्य मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र वायकर आणि आखिल भारतीय मराठी
"मसापत रंगली विविधरंगी कथेची संध्याकाळ"
कधी खळखळून हसणाऱ्या.... तर कधी हळव्या करणाऱ्या... तर कधी गूढतेचा अनुभव देणाऱ्या... तर कधी अंतर्मुख करणाऱ्या कथा ऐकताना रसिकांनी अनोखा अनुभव घेतला. निमित्त होते मसाप पुणे आणि एकपात्री कलाकार परिषद आयोजित 'विविधरंगी कथाकथनाच्या कार्यक्रमाचे' आयोजन करण्यात आले होते. कथाकार कल्पना देशपांडे यांनी उत्कंठापूर्ण 'शब्द' ही कथा सादर केली. विजय कोटस्थाने यांनी 'शुभमंगल सावधान' ही स्वरचित विनोदी कथा सादर केली. भावना प्रसादे यांनी कॉलेज जीवनातील कथा सादर केली. मकरंद टिल्लू यांनी 'पावसातल