

मसापच्या अनुवाद कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद
शनिवार दि. २५ मार्च रोजी मसाप आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अनुवाद कार्यशाळा झाली. डॉ. दामोदर खडसे यांच्या हस्ते उदघाटन उमा कुलकर्णी भारती पांडे आणि रवींद्र गुर्जर यांनी मार्गदर्शन केले. प्रचंड प्रतिसादामुळे हा कार्यक्रम स. प. महाविद्यालयाच्या ज्ञानेश्वर सभागृहात झाला.


विनोदी कथा लिहिणे सर्वांत अवघड काम 'कथा-सुगंध' कार्यक्रमात मंगला गोडबोले यांचे मत
'किस्सा, चुटका आणि विनोदी कथा यात खूप फरक आहे. विनोदी कथा ही प्रथम कथा असावी लागते. त्यात तर्क टिकवून विनोद निर्मिती करायची असते. त्यामुळेच विनोदी कथा लिहिणे सर्वात अवघड काम आहे.' असे मत ज्येष्ठ कथालेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' कार्यक्रमात कथेमागची कथा उलगडून दाखविताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सनीताराजे पवार उपस्थित होते. गोडबोले यां


'लोकशाहीचे मांगल्य धोक्यात' : उल्हासदादा पवार
'मसाप'ने केले यशवंतरावांचे स्मरण पुणे : 'धर्म, जात, समाज, भाषा यांवर आधारित राजकारण करून मतांसाठी भावनिक आवाहन करीत जनतेची दिशाभूल करणे यशवंतरावांना कधीही रुचले नाही. अलीकडील काळात मात्र हे चित्र बदलले आहे. राजकारण्यांची तथ्यहीन वक्तव्ये, अपप्रवृत्ती, संकुचितपणा यामुळे लोकशाहीचे मांगल्यच धोक्यात आले आहे. ' असे मत उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात 'आठवणीतले


'कथासुगंध'
कथासुगंध कार्यक्रमात मंगला गोडबोले यांचा सहभाग महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कथासुगंध कार्यक्रमात सुप्रसिद्ध कथालेखिका मंगला गोडबोले सहभागी होणार आहेत. त्यांच्या आईच्या हाताची आमटी व पायरी या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे कलावंत करतील. त्यानंतर लेखिका मंगला गोडबोले या कथांमागची कथा उलगडणार आहेत. बुधवार, दि. २२ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुण्यातील माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.


"मसाप गप्पा" मध्ये रंगल्या डॉ. अरुणा ढेरे यांच्याशी गप्पा
सोमवार, ०६ मार्च २०१७ रोजी सायंकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री डॉ. अरुणा ढेरे सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याशी लेखिका नीलिमा बोरवणकर यांनी संवाद साधला. या कार्यक्रमात वयाची ६० वर्ष पूर्ण केल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी


"भारताने १०४ उपग्रह अवकाशात सोडले तरीही चौकाचौकात लिंबू-मिर्च्या विकल्या जातात" : डॉ. संतो
'मसाप मध्ये विज्ञान दिनानिमित्त विशेष व्याख्यान' '१९४७ साली भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले, तरी कालबाह्य परंपरांविषयी भारतीयांची मानसिक गुलामगिरी अजूनही संपलेली नाही. त्यामुळेच आपण एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडले तरीही चौकाचौकात लिंबू-मिर्च्या विकल्या जातात. एवढेच नव्हे तर त्याचे वैज्ञानिक स्पष्टीकरणही दिले जाते. याचे कारण आपण विज्ञानाची सृष्टी स्वीकारली पण वैज्ञानिक दृष्टी स्वीकारली नाही.' असे मत भाभा अणुसंशोधन संस्थेतील ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. संतोष टकले यांनी केले. नि