

"ग्रंथसेवकांचे ऋण न फिटणारे" : डॉ. श्रीकांत बहुलकर
'मसाप'ने केला 'ग्रंथाळलेल्या हातांचा' सन्मान अनेक दुर्मिळ आणि संशोधनासाठी उपयुक्त ग्रंथ ग्रंथालयात असत नाहीत. असले तरी ते मिळत नाहीत पण हेच ग्रंथ जुन्या पुस्तकांची विक्री करणाऱ्या ग्रंथसेवकांकडे मिळतात. त्यांची किमंत कमी असली तरी अशा दुर्मिळ पुस्तकांचे मोल करता येत नाही म्हणूनच अशी पुस्तके उपलब्ध करून देणाऱ्या ग्रंथसेवकांचे ऋण न फिटणारे आहे. असे मत भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि स्वायत्त


कै. कृष्ण मुकुंद पुरस्कार 2017
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, संशोधनात्मक लेखनासाठी प्रतिवर्षी 'कृष्ण मुकुंद (उजळंबकर) स्मृती पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या सन २०१७ च्या पुरस्कारासाठी, श्री. शिवाजीराव एक्के (पुणे) यांच्या 'पुरंदरचे धुरंधर' ग्रंथास हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी प्रा. प्रदीप आपटे आणि पत्रकार मयुरेश प्रभुणे यांच्या ग्रंथनिवड समितीने या ग्रंथाची निवड केली. हा पुरस्कार प्रदान समारंभ, सोमवार दिनांक २४ ए
मसाप करणार 'ग्रंथाळलेल्या हातांचा' सन्मान
पुस्तकदिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. बहुलकरांच्या हस्ते होणार सन्मान त्यांचे स्वतःच्या मालकीचे किंवा भाड्याचे पुस्तकाचे दुकान नाही... त्यांचा साहित्य संमेलनातल्या ग्रंथप्रदर्शनात गाळा नसतो... त्यांचा साहित्य संमेलनातील पुस्तकविक्रीच्या कोटीच्या कोटी उड्डाणांशी दुरान्वयानेही संबंध नसतो... तळपणारे ऊन असो, कोसळणारा पाऊस असो, की कडाक्याची थंडी असो, त्यांच्या ग्रंथसेवेत कसलाही खंड पडत नाही... फायदा - तोट्याचा विचार न करता त्यांच्या तीन - चार पिढ्या हे ग्रंथसेवेचे काम व्रत म्हणून करीत


"बदलत्या भारताच्या प्रगतीत डॉ. बाबासाहेबांचे विचार मार्गदर्शक" : मा. जयदेव गायकवाड
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विविध विषयांवरील चिंतन खुप मोठे आहे. आजचा भारत बाबासाहेबांच्या विचारांमुळे कसा बदलतो आहे. प्रत्येक प्रगतीला, बाबासाहेबांचे विचार प्रेरणा देणारे आहेत. बदलत्या भारताच्या प्रगतीत डॉ. बाबासाहेबांचे विचार मार्गदर्शक आहेत. असे मत आमदार जयदेव गायकवाड यांनी व्यक्त केले. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या व त्यांच्यावर लिहिलेल्या दुर्मिळ ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन मसापच्या


'मसाप' चे डॉ. आंबेडकरांना 'ग्रंथप्रदर्शना'तून अनोखे अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना 'मसाप' तर्फे ग्रंथप्रदर्शनातून अनोखे अभिवादन करण्यात येणार आहे. १४ एप्रिल रोजी सायं. ५.०० वा. या ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन आमदार जयदेव गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. भीम गायकवाड उदघाटनापूर्वी भीमवंदना सादर करणार आहेत. हे ग्रंथप्रदर्शन १५ एप्रिल रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत साहित्य प्रेमींसाठी खुले राहणार आहे. या ग्रंथ प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या आण


महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्य अहवाल : १ एप्र
महाराष्ट्र साहित्य परिषदेची धुरा कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे १ एप्रिल २०१६ पासून आली. त्यांच्याबरोबर प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून एका वर्षात मसापला प्रगतीपथावर नेण्यासाठी दमदार पावले टाकली त्याचा हा कार्य अहवाल. १. साहित्य परिषदेचे जन्मस्थळ असलेल्या मळेकर वाड्याची आणि मसापचे संस्थापक न्या. महादेव गोविंद रानडे, साहित्यसम्राट न. चिं. केळकर आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा माधवराव पटवर्धन सभागृहात स्थापित


" मसाप गप्पा "
अशोक नायगावकर यांची साहित्य परिषदेच्या मसाप गप्पा या कार्यक्रमातील प्रा. मिलिंद जोशी यांनी घेतलेली मुलाखत बुधवार दिनांक ५ एप्रिल रोजी खूप रंगली.