

'कवी कालिदास दिनानिमित्त विशेष कार्यक्रम'
"परिषदेत बरसणार कवितेतला पाऊस" मेघांची दाटी ... हिरवाईचा स्पर्श ... आसमंतात दरवळणारा मृदगंध ... आषाढाचा पहिला दिवस... पावसाची चाहूल आणि अबाल वृद्धांना भुरळ घालणारा सदा सनातन आणि तरीही चिरतरुण पाऊस ... त्याने महाकवी कालिदासापासून आजच्या कविपर्यन्त सर्वांना वेड लावले. आणि हा पाऊस गेल्या अनेक शतकांपासून कवितांमधूनही तितक्याच उत्कटपणे बरसतो आहे. लहानपणापासून शिकलेल्या ... ऐकलेल्या ... पाठ केलेल्या पावसाच्या कविता ... महाकवी कालिदासापासून ते बालकवी, केशवसुत, बोरकर, आरती प्रभू, मर्


'मसाप' मध्ये रंगला 'कथासुगंध' कार्यक्रम
'लोकवाङ्मयातील कथांनीच समाजमनाला शहाणपण दिले' - डॉ. प्रतिमा इंगोले पुणे : जगभराच्या लोकवाङ्मयात प्रचंड कथासाहित्य आहे. कथा ही सांगण्यासाठीच असते. कथा कथनामुळे अक्षर ओळख नसणारे लोकही कथेचा आस्वाद घेऊ शकतात, या लोकवाङ्मयातील कथांनीच समाजमनाला शहाणपण दिले, असे मत प्रसिद्ध कथाकार डॉ. प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित 'कथासुगंध' या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिल