

अभिवाचनांतून उलगडला पु. शि. रेगेंच्या साहित्याचा 'सृजनरंग'
'तू हवीस यात न पाप तू हवीस यात समर्थन तू हवि असताना पण हवि असताना कशास तू ? का तू ? तूच का ?
छे छे माझि न तू
यातच पाप अशा एकाहून एक ज्येष्ठ साहित्यिक पु. शि. रेगे यांच्या सरस प्रेमकविता सादर करीत आणि लघुकथांचे अभिवाचन करीत महाराष्ट्र साहित्य परिषदेत 'सृजनरंग' हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक पु. शि. रेगे यांच्या साहित्याच्या अभिवाचनाचे. 'सृजनरंग' या कार्यक्रमाची निर्मिती महाराष्ट्र कल्चरल सेंटरने


शब्द थांबतात, तेव्हा चित्रे बोलू लागतात : शि. द. फडणीस
मसाप गप्पा :शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्रांचा अनोखा आविष्कार पुणे : वयाच्या ९२ व्या वर्षीही सफाईदारपणे, लयबद्ध रीतीने फिरणारा हात ... कुंचल्यातून होणारा व्यंगचित्रांचा अनोखा आविष्कार... व्यंगचित्रांच्या दुनियेतील गमतीजमती सांगताना येणारी मिस्कील स्वभावाची प्रचिती ... ब्रशमध्येही शोधून काढलेला मानवी कंगोरा, असे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या स्वभावाचे नानाविध पैलू प्रेक्षकांनी सोमवारी अनुभवले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'मसाप गप्पा' या उपक्रमांतर्गत फ


चरित्र आणि चारित्र्य म्हणजे बिंब - प्रतिबिंब : डॉ. न. म. जोशी
परिषदेत कै. वामन मल्हार जोशी स्मृती व्याख्यान पुणे : एखाद्या चरित्रनायकाचे खरेखुरे व चांगले चरित्र म्हणजे त्याच्या चारित्र्याचे प्रतिबिंब असते. म्हणून चरित्र व चारित्र्य याचा संबंध बिंब प्रतिबिंबासारखा असतो. पण हे बिंब चरित्रकार ज्या कोनात धरतो त्याप्रमाणे बिंबाचा आकार उमटतो. असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित कै. वामन मल्हार जोशी स्मृती व्याख्यान गुंफताना ते बोलत होते. 'मराठी साहित्य : चरित्र आणि चारित्र्य"
'मसाप'मध्ये सादर होणार पु. शि. रेगेंच्या साहित्यावर आधारित 'सृजनरंग'
महाराष्ट्र साहित्य परिषदेत ज्येष्ठ साहित्यिक (कै.) पु. शि. रेगे यांच्या निवडक कविता आणि कथांच्या अभिवाचनाचा समावेश असलेला 'सृजनरंग' हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरने या कार्यक्रमाची निर्मिती केली असून कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन, संकलन आणि संगीन प्रमोद काळे यांचे आहे. या कार्यक्रमात हर्षद राजपाठक, वेदांत रानडे, ओम श्री बडगुजर, अमृता पटवर्धन आणि सचिन जोशी यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. २६ जुलै २०१७ रोजी सायं. ६.३० वा. साहित्य परि
डॉ. न. म. जोशी यांचे व्याख्यान
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने साहित्यिक कै. वामन मल्हार जोशी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. "मराठी साहित्य : चरित्र आणि चारित्र्य" हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. गुरुवार दिनांक २० जुलै २०१७ रोजी सायं. ६. ३० वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. अशी माहिती कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
'मसाप गप्पा' मध्ये शि. द. फडणीस यांच्याशी गप्पा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार शि. द. फडणीस सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी चारुहास पंडित संवाद साधणार आहेत. सोमवार दिनांक २४ जुलै २०१७ रोजी सायं. ६. ३० वाजता हा कार्यक्रम मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.


अण्णाभाऊंनी मराठी साहित्याचा केंद्रबिंदू हलविला : वि. दा. पिंगळे
पुणे : लोकशाहीर, साहित्यिक, गायक, नाटककार कम्युनिष्ट पक्षाचे कार्यकर्ते वक्ते आण्णाभाऊ यांनी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव सारख्या छोट्या गावातील उपेक्षित, दुर्लक्षित मातंगवस्तीतून आणाभाऊंचा, खडतर प्रवास सुरु झाला. दिड दिवस शाळेत जाण्याचे भाग्य लाभले. मुंबई नगरीत आल्यानंतर त्यांचातला कलावंत, लेखक, कार्यकर्ता घडला. दुकानावरच्या पाट्या वाचून आणि सिनेमाची पोस्टर लावता लावता शब्दांची ओळख झाली आणि आण्णाभाऊ साठे साक्षर झाले. आपल्या शाहिरीतून आणि लेखनांतून दलित, कामगार माणसांची जीवन


"अतिशय साध्या - सोप्या शब्दांमधून मुलांना आनंद देतं ते खरं बालसाहित्य" : रेणुताई गावस्कर
'मसाप' मध्ये शिरोळे बालसाहित्य पुरस्काराचे वितरण पुणे : प्रत्येक आईबाबांना मुलांना गोष्ट सांगता यायलाच हवी, गोष्टींमधून तात्पर्य - शिकवण संस्कार देण्याचा अट्टहास नको तर आनंद देण्याघेण्याची ही गोष्ट असावी. अतिशय साध्या - सोप्या शब्दांमधून मुलांना आनंद देतं ते खरं बालसाहित्य असे मत ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कै. बाबुराव व कै. शांतादेवी शिरोळे स्मृतिप्रीत्यर्थ माया धुप्पड (जळगाव) आणि गोविंद गोडबो


कर्माने भक्ती करणे हाच परमार्थ : ह. भ. प. महेश महाराज नलावडे
साहित्य परिषदेत 'संत सावता माळी' जयंती निमित्त व्याख्यान पुणे : "कर्म सोडून धर्म घडत नाही. मनुष्य जीवनात कर्म हेच सर्वश्रेष्ठ आहे. कर्म सोडून परमार्थ करणार्यांना सुख लाभत नाही. कर्माने भक्ती करणे हाच खरा परमार्थ आहे." असे मत ह. भ. प. महेश महाराज नलावडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने संत सावंत माळी पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संत सावंत माळी : जीवन आणि विचार हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्


नवकथेला आलेले साचलेपण जीएंच्या कथांनी दूर केले : प्रा. मिलिंद जोशी
'जी.एं. पत्रास विनाकारण की' या पुस्तकाचे प्रकाशन; साहित्य परिषदेतर्फे कार्यक्रम पुणे : स्थळकाळात असणारी मानवी आयुष्यातील सुखदुःखे आणि त्यांच्या तळाशी असणारे अविनाशी सत्य यांचे दर्शन जी. ए. कुलकर्णी यांनी आपल्या कथांमधून घडविले. अर्थसंपन्न प्रतिमासृष्टी आणि व्यामिश्र जीवनानुभूतीतील वेध लावणारी गूढता यामुळे त्यांच्या कथा वैशिष्टयपूर्ण ठरल्या. ठराविक रुपबंधांच्या साच्यामुळे नवकथेला आलेले साचलेपण जीएंच्या कथांनी दूर केले.' असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिल