

विंदांच्या साहित्यात जीवनदृष्टी आणि कलादृष्टीचा समन्वय
दिलीप करंबळेकर : साहित्य परिषदेत विंदांना अभिवादन विंदांच्या साहित्यात जीवनदृष्टी आणि कलादृष्टी यांचा सुरेख समन्वय आहे, असे मत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतील शाहीर अमरशेख अध्यासना
'मसाप'च्या पुरस्कार निवडीत आता वाचकांचाही सहभाग
कार्यकारी मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; निवड पारदर्शी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार श्रेष्ठता पुरस्काराच्या निवडीत आता वाचकही सहभागी होणार आहेत. साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, पुरस्कार निवडीसाठी असा निर्णय घेणारी 'मसाप' ही महाराष्ट्रातील पहिली साहित्य संस्था ठरली आहे. अशी माहिती साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी य
मसापच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिल्ली विद्यापीठाच्या निषेधाचा ठराव
अध्यक्षांनीच मांडला ठराव; सभेने एकमताने केला मंजूर अभ्यासक्रमातून मराठी भाषा वगळण्याच्या दिल्ली विद्यापीठाच्या निर्णयाचा निषेध करणारा ठराव महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनीच हा ठराव मांडला तो सभेने एकमताने मंजूर केला, अशी माहिती साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्व साधारण सभा परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली न


प्राध्यापकांच्या विद्वत्तेचा दरारा कमी झाला आहे का ?
डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचा सवाल, डॉ. जोगळेकर पुरस्कार वितरण दिवसेंदिवस महाविद्यालयात वर्गात तासाला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटते आहे. हे चिंताजनक आहे. प्राध्यापकांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. पूर्वी व्यासंगी प्राध्यापकांच्या तासांना त्या विषयाचेच नव्हे तर अन्य विषयांचेही विद्यार्थी उपस्थित राहत असत. एवढा प्राध्यापकांच्या विद्वत्तेचा दरारा होता. आज तो का कमी झाला आहे ? याचे चिंतन केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आणि महाराष्ट्र सा


खंडाळ्याच्या शिवारात रंगले मसापचे पहिले शिवार साहित्य संमेलन
चोहीकडे हिरवेगार डोंगर, उंच नारळाची गर्द झाडी, उसाची हिरवीगार शेती, पक्ष्यांचे मंजुळ आवाज, जनावरांचे हंबरण्याचे आवाज आणि त्यांच्या गळ्यातील वाजणाऱ्या घंटा, ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट अशा प्रसन्न वातावरणात गावातले शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांनी साहित्याचा आस्वाद घेतला. ना मंडप, ना भपका, ना कुण्या पुढाऱ्यांचा बढेजाव, ना सत्कार सोहळ्याचे कौतुक, ना रुसवे फुगवे बळीराजाच्या आणि काळ्या आईच्या सहवासात माती, नाती आणि संस्कृतीचा जागर करीत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इतिहासा


मुलांसाठी वेळ द्या, संवाद साधा आणि अपयशातही पाठराखण करा
साहित्य परिषदेतील परिसंवादात मान्यवरांचे मत पुणे : कोवळ्या मुलांच्या आत्महत्या हा सामाजिक कलंक आहे. मुलांना केवळ भौतिक सुविधा देऊन पालकांची जबाबदारी संपत नाही. मुलांसाठी वेळ द्या, संवाद साधा आणि अपयशातही पाठराखण करा, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, शब्दांगण आणि रोहन प्रकाशन यांच्या वतीने आयोजित शोध अस्वस्थतेचा : मुलांच्या आत्महत्येचा या विषयावरील परिसंवादात लेखक राजीव तांबे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संज्योत देशपांडे, संगणकतज्ज्ञ अतुल कहाते, डॉ. वर्षा तोड


माणूस आहे तोवर कथा असणारच : डॉ. छाया महाजन
साहित्य परिषदेत रंगला कथा-सुगंध कार्यक्रम पुणे : सगळ्या क्षेत्रात उलथा पालथ होणारे समाजिक, राजकीय, धार्मिक, पर्यावरणीय जीवन आहे. नवनवीन शोधांनी, विचार मंथनातून समाज जीवनात परिवर्तन होतेय. या सगळ्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज लेखकाला असावी लागते. उर्मीबरोबरच समाजाबद्दल, व्यक्तीबद्दल, समुहाबद्दल संवेदनशील असले पाहिजे. कारण मानवी जीवनात घटना आहेत. साहित्याचे मूळ स्वरूप हे करुणा आणि वेदना आहे. अलीकडचे ग्रामीण, दलित किंवा स्त्रीवादी साहित्य ही उदाहरणे आहेत. नवीन येऊ घातलेले तृतीयपंथ


खेळ हा आरोग्याचा पाया : सदानंद मोहोळ
मसापचा कै. विलास शंकर रानडे स्मृतिपुरस्कार मनीषा बाठे याना प्रदान खेळ आणि व्यायाम या गोष्टी आरोग्याचा पाया आहेत. कोणत्याही क्षेत्रात शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची असते. टक्केवारीच्या आग्रहापायी या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, मुलांच्या हिताचे नाही असे परखड मत प्रख्यात माजी क्रिकेट खेळाडू सदानंद मोहोळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कै. विलास शंकर रानडे स्मृतीपुरस्कार प्रदान समारंभात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पव
"दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात 'मराठी' राहिलीच पाहिजे"
मसापचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रिय शिक्षणमंत्री, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू आणि ४८ खासदारांना पत्र पुणे : "दिल्ली विद्यापीठाने त्यांच्या चार प्रमुख विषयातून मराठी भाषा वगळण्याच्या घेतलेला निर्णय घटनाबाह्य, दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. तसेच हा विषय घेतल्यास एकूण गुणांमधून पंचवीस टक्के गुणांची कपात करण्याचा घेतलेला अविचारी निर्णय मराठी भाषकांसाठी क्लेशदायक आहे. त्यामुळे हा संकुचित निर्णय तात्काळ रद्द करून तेथे मराठी भाषेच्या अध्ययनाची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली