

मी मराठीच बोलेन... मी मराठीतूनच सही करेन
बालकुमारांनी संमेलनाच्या समारोपात केले ठराव 'मी मराठीच बोलेन... मी मराठीतूनच सही करेन ... मी रोज पुस्तकाचे एक पान वाचल्याशिवाय झोपणार नाही... माझ्या आयुष्यात अवांतर वाचनाला आणि खेळाला नेहमीच प्राधान्य देईन... मी मोबाईलचा कमीत कमी वापर करेन... मी मित्रांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुस्तकेच भेट देईन... मी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे ठराव बालकुमारांनी आवाजी मतदानाने मंजूर करून समारोपाचे सत्र दणाणून टाकले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मनशक्ती प्र


लिहणं हे स्वत:शी बोलंणंच असतं - डॉ. अनिल अवचट
धुंवाधार पावसात रंगला लोणावळ्यात साहित्याचा उत्सव, बालकुमार साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन बाहेर कोसळणारा धुंवाधार पाऊस, सभोवतीचा हिरवागार निसर्ग, आपल्या लयीत कोसळणारे सुंदर धबधबे आणि सभागृहात कोसळणारा शब्दांचा पाऊस. अशा मनोहारी वातावरणात मनशक्ती प्रयोग केंद्राच्या परिसरात बालकुमारांनी हशा आणि टाळ्यांच्या साथीने साहित्याचा मनमुराद आनंद लुटला. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोणावळ्यातील पहिल्या बालकुमार साहित


'मर्ढे व्हावे कवितेचे गाव आणि वाङ्मयीन पर्यटनस्थळ'
साहित्य परिषदेच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद पुणे : आधुनिक मराठी कवितेचे जनक आणि युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांचे मूळगांव असलेल्या मर्ढे (जि. सातारा) या गावाला कवितेचे गाव म्हणून विकसित करताना तिथे गेल्या सातशे वर्षातली प्रातिनिधिक मराठी कविता कवींच्या परिचयासह कोरली जावी आणि या गावाला वाड्मयीन पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी सांस्क


'मसाप'चे पहिले बालकुमार साहित्य संमेलन लोणावळ्याला
अध्यक्षपदी डॉ. अनिल अवचट; २० सप्टेंबरला होणार संमेलन पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे लोणावळा येथे आयोजन करण्यात आले आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षस्थान बालकुमारांसाठीच्या लेखनाबद्दल साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट भूषविणार आहेत. या संमेलनाला परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आण


पुस्तकांचे पंख लावून उंच भरारी घ्या : डॉ. अरुणा ढेरे
मसापच्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात हुजूरपागा प्रशालेत रंगला संवाद पुणे : तुमच्या संवेदना जाग्या ठेवा, डोळसपणे जगाकडे पहा. खूप वाचा. विचार करा. आयुष्याला सुंदर करणाऱ्या खूप गोष्टी तुमच्या हाती लागतील, त्यासाठी पुस्तकांचे पंख लावून उंच भरारी घ्या, असा सल्ला प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी विद्यार्थिनींना दिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात हुजूरपागा प्रशालेतील विद्यार्थिनींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स


"डॉ. मेहेंदळे यांचा साहित्य परिषदेतर्फे सत्कार"
साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर झाल्याबद्दल, ज्येष्ठ संस्कृत पंडित डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचा, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घरी जाऊन मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पुणेरी पगडी,उपरणे, पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन सत्कार केला. यावेळी कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होत्या. या सत्काराबद्दल आनंद व्यक्त करून मेहेंदळे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.