

'देणाऱ्याने देत जावे' तून उलगडले विंदा
पुणे : मानवी जीवनातील स्पंदनांचे पडसाद आपल्या कवितेतून उमटवणारे, स्त्रीमन जाणणारे, लहान मुलांची नस ओळखून त्यांच्यासाठी कविता लिहिणारे, देशसेवेसाठी कर्तव्य म्हणून तुरुंगात जाणारे, सुबक भाकरी करणारे, समरसून तबला वाजवणारे, हौसेखातर पिशवी घेऊन बाजारात जाणारे सुमाताईंचे 'तिरसिंगराव' पती... अशी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची विविध रूपे 'देणाऱ्याने देत जावे' या अनोख्या कार्यक्रमातून सोमवारी उलगडली. विंदांच्याच लेखनाविष्काराच्या अभिवाचनातून कार्यक्रमाची रंगत
मसाप आणि पंजाबी साहित्य अकादमी यांच्यात सामंजस्य करार
भाषिक सौहार्दाबरोबरच साहित्याचे आदान-प्रदान होणार पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी लुधियाना (पंजाब) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे भाषिक सौहार्दाबरोबरच उत्तम साहित्य कृतींचे अनुवाद, दोन्ही भाषांतील लेखकांचा संवाद, पुस्तक प्रदर्शने, संशोधन, साहित्य संमेलन आणि कार्यशाळा याना चालना मिळणार आहे. यामुळे मराठी-पंजाबी भाषा भगिनींचा स्नेह दृढ होण्याबरोबरच साहित्याचे आदान-प्रदान होईल अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.


विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त ३० ऑक्टोबरला 'देणाऱ्याने देत जावे' हा विशेष कार्यक्रम
मसाप आणि अक्षरधारातर्फे आयोजन पुणे : समग्र जीवन आपल्या कवितेतून कवेत घेणारे कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरधारा बुक ग्यालरी यांच्या संयुक्त विद्यमाने 'देणाऱ्याने देत जावे' या अर्थगंभीर कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ रोजी सायं. ६. ०० वाजता टिळक स्मारक मंदिरात करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठीची साहित्यनिवड, संहिता आणि बांधणी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची असून डॉ. अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ


मसापच्या विभागीय साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी रंगनाथ पठारे स्वागताध्यक्षपदी नरेंद्र फिरोदिया, नो
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे सावेडी उपनगर शाखा, अहमदनगर आयोजित विभागीय मराठी साहित्य सम्मेलन ४ आणि ५ नोव्हेंबरला अहमदनगरला होणार आहे या सम्मेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करण्यात आली आहे. नरेंद्र फिरोदिया यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. विभागीय साहित्य सम्मेलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी नगर येथे प्रा. मि