

सामाजिक भान हीच मराठी कवितेची खरी श्रीमंती आहे : कवी उद्धव कानडे
मसाप व अक्षरभारती तर्फे 'महात्मा फुले अभिवादन कविसंमेलन' "महात्मा फुले यांनी आपल्या अखंडातून आणि केशवसुतांनी कवितेतून समृद्ध सामाजिक अशयाद्वारे मराठी कवितेला श्रीमंती प्राप्त करून दिली. मराठी कविता याच मूल्यविचारांच्या पायावरती आज उभी आहे. इथला सारा समाज माझा आहे. धर्म, जात कोणतीही असुदे कवी हा चांगला माणूस असणं फार महत्त्वाचं आहे. समतेचा विचार जगणारा कवीच समाजजीवनाला सुंदर बनवू शकतो. समाजनिष्ठ कवी समाजात नवी क्रांती घडवू शकतो. ज्याचं हृदय अंतर्बाह्य मानवतेच्या विचारांनी फुलल


राजवाडेंच्या वृत्तीतली निर्भयता आजच्या विचारवंतात नाही : डॉ. श्री. मा. भावे
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मसापतर्फे सत्कार आजचे विचारवंत समाजाला आवडणारे आणि पटणारे विचारच मांडतात. आहिताग्नी राजवाडे याला अपवाद होते अफाट व्यासंग आणि सूक्ष्म अभ्यासातून स्वतःला पटलेला आणि समाजाला न आवडणारा आणि पटणारा विचार त्यांनी ठामपणे मांडला. त्यांनी ज्ञानसाधना करताना लोकानूनय केला नाही आहिताग्नी राजवाडे यांच्यासारखी वृत्तीतली निर्भयता आजच्या विचारवंतात नाही, असे मत इतिहास संशोधक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. श्री. मा. भावे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदे


डॉ. आनंद यादव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम
ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद, मेहता पब्लिशिंग हाऊस, ग्रामीण साहित्य परिषद, यादव परिवार आणि मित्रमंडळींच्या वतीने 'डॉ. आनंद यादव जीवन आणि साहित्य' या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होणार असून माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी आहेत. या चर्चासत्रात महारा


आप्पा खोतांच्या कथाकथनाने साहित्य परिषदेमध्ये हास्यकल्लोळ
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' या कार्यक्रमात आप्पा खोत यांचे कथाकथन ‘मरणाघरी आणि तोरणादारी माणसांनी जबाबदारीने वागावे ही साधी अपेक्षा; पण मरण पावलेल्या म्हातारीच्या घरी गावातील इरसाल बायका-माणसे कशी वागतात याचे भन्नाट नमुने आपल्या खास -शैलीत सादर करीत, 'मढं गाजविणे' या वाकप्रचाराचा उपयोग ग्रामीण भागातले लोक प्रत्यक्ष जीवनात कसा करतात याच्या गमतीशीर गोष्टी सांगत ज्येष्ठ ग्रामीण कथाकार आणि कथाकथनकार प्रा. आप्पा खोत यांनी साहित्य रसिकांना खळखळून हसविले. त्यांच्या कथाक


संघर्षाची आत्मकथा ऐकताना भारावली नूमवि प्रशालेतील मुले
सापच्या 'लेखक तुमच्या भेटीला' उपक्रमात इंदुमती जोंधळे यांनी उलगडला जीवनप्रवास
पुणे : मला घरच नव्हतं... भूक लागल्यानंतर पोटात आग पडायची... दिवाळी आणि मेच्या सुट्टीत वसतिगृहात जेवायला मिळायचं नाही... अशावेळी थंडगार पाणी पिऊन भूक भागवायची... भूक विसरण्यासाठी पुस्तकं वाचायची, या पुस्तकांनी खूप दिलं आणि माझं आयुष्य घडवलं... अशा शब्दात बिनपटाची चौकट या पुस्तकाच्या लेखिका इंदुमती जोंधळे यांनी आपला जीवनप्रवास उलगडला आणि त्यांची ही संघर्षमय आत्मकथा ऐकताना मुले भारावली. महाराष्ट्र स


समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. हरिश्चंद्र थोरात
२९ आणि ३० नोव्हेंबरला साताऱ्याला होणार संमेलन पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी (सातारा) आणि छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन २९ आणि ३० नोव्हेंबरला साताऱ्याला होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. समीक्षा : सिद्धांत आणि व्यवहार असे सूत्र असणाऱ्या या संमेलनाचे उद


साहित्य परिषदेत हास्यवंदनेतून 'पु. लं.'ना अभिवादन
महाराष्ट्र साहित्य परिषदेत ‘आम्ही एकपात्री’ या संस्थेच्या कलाकारांनी पु.लं.ना आपल्या विविधरंगी विनोदी सादरीकरणांनी 'हास्यवंदना' दिली. आम्ही एकपात्री आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ख्यातनाम साहित्यिक आणि कलावंत पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला, एकपात्री दिनानिमित्त आयोजित 'हास्यवंदना' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वंदन नगरकर यांनी रामनगरीमधले अनेक धमाल किस्से सादर केले. संतोष चोरडिया यांनी विविध कलाकारांच्या आवाजात पु.लं.ना अभिव
महाराष्ट्र साहित्य परिषदे तर्फे दिवाळी अंक स्पर्धा
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गेली २० वर्षे दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे स्पर्धेसाठी आलेल्या दिवाळी अंकातून ४ सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांना अ. स. गोखले स्मृत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक', चंद्रकांत शेवाळे (संपादित, ग्रहांकित) पुरस्कृत 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक', 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' आणि 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' तसेच, दिवाळी अंकांतील उत्कृष्ट कथेसाठी 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक', उत्कृष्ट ललितलेखासाठी


मसापच्या 'लेखक तुमच्या भेटीला' कार्यक्रमात इंदुमती जोंधळे
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे सहभागी होणार आहेत. अप्पा बळवंत चौकातील नूतन मराठी विद्यालयातील मुलांशी त्या संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कार्यवाह माधव राजगुरू यांनी दिली.


पुलोत्सवानिमित्त साहित्य परिषदेत ११ आणि १२ नोव्हेंबरला कार्यक्रम
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना आदरांजली वाहणाऱ्या चौदाव्या पुलोत्सवानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत ११ आणि १२ नोव्हेंबरला दोन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
११ नोव्हेंबर (शनिवार) रोजी 'चार संपादक' या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगांवकर, गोविंद तळवलकर, अरुण साधू आणि ह. मो. मराठे यांच्या पत्रकारितेतील योगदानाविषयी रविमुकुल, राजीव खांडेकर, आनंद आगाशे आणि दिनकर गांगल बोलणार आहेत.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पुलं