

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा मिलिंद जोशी
पुणे : बलभीम साहित्य संघ कुद्रेमनी (जि. बेळगाव) यांच्या वतीने आयोजित १२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि लेखक प्रा मिलिंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील बेळगांव जिल्ह्यातील कुद्रेमनी येथे होणाऱ्या साहित्य सम्मेलनाचे हे 12 वे वर्ष आहे. सीमाभागातील मराठी बांधवांचे मनोबल वाढविण्यासाठी हे सम्मेलन प्रतिवर्षी घेतले जाते. ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा, मराठी अभिमान गीत सादरीकरण, परिसंवाद, कविसम्मेलन, कथ


'महाराष्ट्रात अजूनही वैचारिक निरक्षरता' : प्रा. तेज निवळीकर
साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृती व्याख्यान
पुणे : समाजात सामाजिक न्याय असतो. समूहात तो नसतो. आपण समूहात राहतो की समाजात याची जाणीव अद्याप लोकांना नाही. महाराष्ट्रात अजूनही वैचारिक निरक्षरता आहे. असे मत प्रा. तेज निवळीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृती व्याख्यांन गुंफताना ते बोलत होते. 'उपेक्षित समाज आणि गाडगेबाबांचे विचार' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. व्यासपीठावर परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पा


'निसर्गतत्त्व हा टागोरांच्या साहित्याचा आत्मा' डॉ. माधवी भट ; का. र. मित्र व्याख्यानमालेत व्
पुणे : "अजाणत्या वयापासून वाट्याला आलेले एकटेपण आणि झालेले जवळच्या व्यक्तींचे मृत्यू यामुळे निसर्ग हाच रवींद्रनाथ टागोरांचा जवळचा मित्र बनला. हाच निसर्ग त्यांच्या समग्र साहित्यात भरून उरला आहे. निसर्गतत्त्व हा टागोरांच्या साहित्याचा आत्मा आहे." असे मत बंगाली साहित्याच्या अभ्यासक डॉ. माधवी भट यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित मासिक मनोरंजनकार का. र. मित्र व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या 'रवींद्रनाथांचे कथाविश्व' हा त्यांच्या व्य


बडोदा संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा मसापतर्फे २३ डिसेम्बरला सत्कार
पुणे : ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १६,१७ आणि १८ फेब्रुवारी २०१८ ला बडोद्याला होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातसून, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने विशेष सत्कार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी बडोदा संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, कार्यवाह वनिता ठाकूर


"प्रेमचंद यांनी समाजमनाची सूक्ष्म स्पंदने साहित्यात टिपली ": डॉ. दामोदर खडसे
मसापच्या का. र. मित्र व्याख्यानमालेला प्रारंभ पुणे : 'हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या साहित्याने समाजाला स्वातंत्र्य लढ्यासाठी तयार केले. लोकांमध्ये चेतना निर्माण केली. त्याच बरोबर समाजातील धर्मांधता, जातिभेद, अंधश्रद्धा, रूढीपरंपरा यांच्यावर त्यांनी आपल्या लेखनातून प्रहार केले. प्रेमचंद यांनी समाजमनाची सूक्ष स्पंदने आपल्या साहित्यात टिपली.' असे मत प्रसिद्ध अनुवादक डॉ. दामोदर खडसे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मासिक मनोरंजनकार का. र. मित्र व्याख्यान उदघाटन
मराठीच्या अभिजातसाठी 'मसापतर्फे' दिल्लीत धरणे आंदोलन
पंतप्रधानाचे लक्ष वेधणार, ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन हवे सातारा, (प्रतिनिधी)- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाबाबतचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सुधारित कॅबिनेट नोट तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पत्राव्दारे कळवले होते. परंतु या घटनेस सहा महिने होऊन गेले तरी याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. 27 फेब्रुवारी 2018 पूर्वी याबाबत निर्णय घेऊन ठोस आश्वासन द्यावे यासाठी 26 जानेवारीला पंतप्रधानाचे या प


'साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार'
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा बुधवार दिनांक १३ डिसेम्बर २०१७ रोजी सायं. ६.१५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.