

'अभिजात साठी 'मसाप' चा दिल्लीत आवाज'
पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिल्लीत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता पण दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेला अभिजातचा दर्जा देण्याची सद्सद्विवेकबुद्धी केंद्र सरकारला मिळावी यासाठीशिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर प्रार्थना केली आणि जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी,साताऱ्य


दीपा मंडलिक यांना मसापचा कै. चिं. वि. जोशी साहित्य पुरस्कार
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, विनोदी साहित्य लेखनासाठी कॉन्टिनेन्टल पुरस्कृत कै. चिं. वि. जोशी पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी या वर्षी दीपा मंडलिक मुंबई यांच्या 'दिवस असे की' या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सायन पब्लिकेशन, पुणे या संस्थेलाही हा पुरस्कार दिला जाणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जेष्ठ साहित्यिक शकुंतला फडणीस आणि डॉ सुवर्णा दिवेकर यांच्या निवड समितीने या पुरस्कारासाठी ग्रंथाची निव


साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु
अनमोल ठेव्याचे होणार जतन, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराचे मोलाचे सहकार्य पुणे : शतकोत्तर दशकपूर्तीचा टप्पा पार केलेल्या आणि महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु झाले आहे. १८०० सालापासूनच्या दुर्मीळ ग्रंथांचा त्यात समावेश आहे. या कामासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे सहकार्य साहित्य परिषदेला लाभले आहे. या ग्रंथांचे डिजिटायजेशन प


डॉ. न. म. जोशी यांच्याशी गप्पा आणि सत्कार
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. न. म. जोशी यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम मसापच्या 'मसाप गप्पा' या उपक्रमात होणार आहे. डॉ. न. म. जोशी यांच्याशी डॉ. विनिता आपटे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात वयाची ८२ वर्ष पूर्ण केल्याबद्दल डॉ. न. म. जोशी यांचा विशेष सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहे.


'मराठीच्या अभिजात दर्जासाठी 'मनसे' प्रयत्न करा'
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राज ठाकरे यांना अवाहन पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून आता केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. 'मन की बात' करणार्यांकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्याचे काम करवून घेण्यासाठी 'मनसे' प्रयत्न करा. असे अवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केले.
कवी सुधांशु जन्मशताब्दी आणि अमृतमहोत्सवी साहित


राजेंद्र बनहट्टी यांच्या गौरवार्थ साहित्य परिषदेत स्त्रीप्रधान व्याख्याने
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र बनहट्टी हे १४ जानेवारी रोजी ८० वर्षांचे होत आहेत आणि ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे चिरंजीव आणि सुविचार प्रकाशन मंडळ या प्रकाशन संस्थेचे संचालक श्री. चैतन्य बनहट्टी आणि कन्या डॉ. सौ. पद्मिनी सुधीर यांनी साहित्य परिषदेला देणगी दिली आहे. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी साहित्य परिषद राजेंद्र बनहट्टी यांच्या गौरवार्थ दोन व्याख्


'कथासुगंध कार्यक्रमात राजेंद्र माने यांच्या कथांचे अभिवाचन'
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कथासुगंध या कार्यक्रमात प्रसिद्ध कथाकार राजेंद्र माने सहभागी होणार आहे. त्यांच्या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे विद्यार्थी करणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार दि. १७ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.


मराठीच्या ‘अभिजात’ दर्जासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन
मुंबईत शिष्टमंडळाशी प्रस्तावाबाबत चर्चा पुणे, दि. 11 (प्रतिनिधी)- मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून आता केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. या साहित्य परिषदेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळावा यासाठी पूर्ण प्रयत्न करेन असे आश्वासन केंद्रीय भुपृष्ठ, वाहतूक व नौवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.
मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिल


'मसाप तर्फे अभिजातसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन'
पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्तिशः पाठपुरावा करावा यासाठी त्यांची भेट घेऊन कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी साहित्य परिषदेतर्फे त्याना पत्र दिले. सोबत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, ज्येष्ठ कवयित्री डॉ अरुणा ढेरे आणि डॉ सतीश देसाई. पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्काळ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना फोन लावून त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली.


महाराष्ट्र साहित्य परिषदेत रंगले 'डॉक्टर, तुम्हीसुद्धा' नाटकाचे अभिवाचन
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि नाट्यगंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. अजित दळवी लिखित 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' या नाटकाचे अभिवाचन डॉ. मधुरा कोरान्ने, सिद्धार्थ जोशी, ओंकार जाधव आणि चित्रा देशपांडे यांनी केले. हे अभिवाचन खूप रंगले. अभिवाचनाच्या या कार्यक्रमाला रसिकांनी गर्दी केली होती. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह बंडा जोशी उपस्थित होते. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.