

साहित्य परिषदेत सावरकरगीते ऐकताना साहित्य रसिक भारावले प्राण सागरा तळमळला या कार्यक्रमातून सावरकरां
पुणे : शतजन्म शोधिताना, मला देवाचे दर्शन घेऊ द्या, हे मातृभूमी तुजला, की न व्रत घेतले हे आम्ही अंधतेने, ने मजसि ने परत मातृभूमीला, जयोस्तुते श्री महन्मंगले या सारख्या प्रखर राष्ट्रभक्तीने भारलेल्या आणि मातृभूमीच्या ओढीने लिहिलेल्या, विनायक दामोदर सावरकरांच्या प्रसिद्ध कविता, गीते, नाट्यपदे ऐकण्याचा दुर्मिळ योग् महाराष्ट्र साहित्य परिषद आणि झलक पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य रसिकांना आला आणि सावरकर गीते ऐकताना साहित्यरसिक भारावून गेले. या कार्यक्रमाला साहित्यप्र


'मसाप' मध्ये विज्ञान दिनानिमित्त डॉ. एन. जे. पवार यांचे व्याख्यान
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य व आधुनिक विज्ञान हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. हे व्याख्यान बुधवार दि. २८ फेब्रुवारी २०१८ रोजी सायं. ६. ३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.


'मसाप' मध्ये कुसुमाग्रजांना अभिवाचनातून अभिवादन
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या लेखणीतून साकारलेल्या 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकाचे अभिवाचन करण्यात येणार आहे. असंख्य भारतीय क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता असलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित हे नाटक आहे. अंजली लाळे, संज्ञा कुलकर्णी, वैशाली कणसकर, मधुरा शहाणे, जया जुन्नरकर हे या अभिवाचनात सहभागी होणार आहेत. मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी सायं. ६.३० वा. महाराष्ट्र स


पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते : इंदुमती जोंधळे
मसापचे चाकणला रंगले बालकुमार साहित्य संमेलन पुणे : जे जे चांगले आहे ते ते टिप कागदासारखे टिपून घ्या. छोट्या संकटांनी निराश होऊ नका. आयुष्य सुंदर आहे ते भरभरून आणि समरसून जगायला शिका पुस्तकांशी मैत्री करा पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते. असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पिंपरी-चिंचवड आणि मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या वतीने आयोजित चाकण येथील बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. महाराष


सुरेश भट यांच्या शिष्यांनी तिसऱ्या पिढीला दहशतीत ठेवले :- भूषण कटककर
पुणे : सुरेश भट साहेबांचे शिष्यत्व पत्करलेल्या गझलेतील दुसऱ्या पिढीने सुरेश भटांनंतर तिसऱ्या पिढीला सतत दहशतीत ठेवले. सुरेश भट आणि माझी भेट झाली नाही. नाहीतर मी पण त्यांच्या दहशतीत गेलो असतो. आज गझलकार म्हणून उभा राहिलो नसतो. गझलेवर इस्लाह होणे तंत्राच्या दृष्टीने योग्य आहे. असे परखड मत गझलकार भूषण कटककर आणि सुप्रिया जाधव यांनी व्यक्त केले. 'एक कवयित्री एक कवी' या मसापने आयोजित केलेल्या मैफिलीत ते बोलत होते. एकापेक्षा एक सुंदर गझलांच्या सादरीकरणाने दोघांनी रसिकांना प्रचंड दाद


सैनिक देशासाठी जात आणि धर्म विसरून लढतात, देशातील नागरिकांना ते का जमत नाही? विनायक अभ्यंकर यांचा स
महाराष्ट्र साहित्य परिषदेत युद्धाच्या कथा ऐकताना भारावले श्रोते
पुणे : सैनिक देशासाठी जात आणि धर्म विसरून लढतात देशातील नागरिकांना ते का जमत नाही? असा सवाल लेप्टनंट कमांडर (निवृत्त) विनायक अभ्यंकर यांनी विचारला महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कै माधव मदाने स्मृती व्याख्यान गुंफताना ते बोलत होते 'युद्धस्य कथा रम्य:' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी ,प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. भारत-पाक


'मसाप गप्पा' मध्ये डॉ. माधव गोडबोले यांच्याशी गप्पा
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' कार्यक्रमात माजी केन्द्रीय गृह व न्यायसचिव आणि सामाजिक जीवन व धोरणासंबंधीच्या वीस महत्वपूर्ण मराठी आणि इंग्रजी पुस्तकाचे लेखक डॉ. माधव गोडबोले सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ डॉ. गोडबोले यांच्याशी संवाद साधणार आहेत. जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व-एक सिंहावलोकन, लोकपालाची मोहिनी, सुशासन हे दिवास्वप्नच, सत्ता आणि शहाणपण, प्रशासनाचे पैलू खंड १ आणि २, नव्या दिशा बदलते संदर्भ, धर्मनिरपेक्षता-धोक्याच्या वळणावर, भारतीय संस
मसाप मध्ये रंगणार गझलांची मैफल
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एक कवयित्री एक कवी या कार्यक्रमात प्रसिद्ध गझलकार भूषण कटककर आणि सुप्रिया जाधव सहभागी होणार आहेत. त्यांच्या बरोबरच्या गप्पा आणि गझला ऐकण्याची संधी साहित्य रसिकांना मिळणार आहे. कवी उध्दव कानडे आणि प्रमोद आडकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी, सायंकाळी ६.०० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली.


'रामगणेशाय नमः' तून उलगडले भाषाप्रभू गडकरी
स्मृतिशताब्दी प्रारंभानिमित्त 'मसापचे' अभिवादन पुणे : प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन, एकच प्याला या अजरामर नाटकातील निवडक नाट्यांशांचे अभिवाचन... गोविंदाग्रज या टोपणनावाने लिहिलेल्या 'वाग्वैजयंती' मधील कवितांचे सादरीकरण. . . आणि बाळकराम या टोपणनावाने लिहिलेल्या विनोदी लेखनाच्या अभिवाचनातून नाटककार, कवी आणि विनोदी लेखक भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचा साहित्य आणि जीवनप्रवास उलगडला. निमित्त होते राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी प्रारंभानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेन


'आयुष्यावर कधीही रुसू नका' डॉ. संगीता बर्वे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला'
भारती विद्यापीठाच्या शंकरराव मोरे विद्यालयात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'लेखक तुमच्या भेटीला' कार्यक्रम पुणे :
कधी न रुसावे आयुष्यावर
अडचणीतही सदा हसावे
किती जाहले कष्ट तरीही
समाधान परी मुखी दिसावे
असा संदेश कवितेतून अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. संगीत बर्वे यांनी भारती विद्यापीठाच्या aशंकरराव मोरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'लेखक तुमच्या भेटील