

‘मसापचा कै. रा. श्री. जोग पुरस्कार डॉ. वासुदेव मुलाटे याना जाहीर’
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, प्रख्यात समीक्षक कै. रा. श्री. जोग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, एका समीक्षा ग्रंथाला, दरवर्षी एक विशेष मानाचा पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या 'बिंब प्रतिबिंब' या समीक्षा ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. ग्रंथाचे प्रकाशक म्हणून स्वरूप प्रकाशन,पुणेच्या राजश्री पांगारकर यांनाही हा पुरस्कार दिला जाणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. मनोहर जाधव, डॉ. तुक
डॉ, शिरवाडकर, डॉ. पानतावणे आणि डॉ. ढवळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मसापतर्फे २ एप्रिलला श्रद्धा
पुणे : ज्येष्ठ समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर, ज्येष्ठ साहित्यिक, संपादक डॉ. गंगाधर पानतावणे आणि ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ, प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. म. के. ढवळीकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवार २ एप्रिल रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात श्रद्धांजली सभा घेण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.


पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर
१३, १४ आणि १५ एप्रिलला आळंदीत होणार संमेलन पुणे : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक आणि लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या व्यासंगी अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे होणार आहे. अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त आणि साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीक


माणसाच्या वागण्यातील सुसंगती आणि विसंगतीचा शोध कथा घेते : मृणालिनी चितळे महाराष्ट्र साहित्य परिषदेत
पुणे : जिग्सॉ पझल सोडवणं - कथा लिहणं म्हणजे माणसाच्या आयुष्यातील अनेक शक्यतांचा प्रवास साकार करणं असतं. वर्षानुवर्ष आपल्या मनात घर करून बसलेल्या माणसांना घर मिळवून देणं असतं. माणसाच्या वागण्यातील सुसंगती आणि विसंगती यांचा शोध घेणं असतं. असे मत प्रसिद्ध लेखिका मृणालिनी चितळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित 'काथसुंगंध' कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्या 'नातं' व 'शिंदबाजचा म्हातारा' या कथांचे अभिवाचन शुभांगी दामले व सौदामिनी साने यांनी केले. य


१३२ वर्षं जुना गणिताचा दुर्मीळ ग्रंथ मसाप कडे सुपूर्द
१३२ वर्षं जुना गणिताचा दुर्मीळ ग्रंथ मसाप कडे सुपूर्द रावजी मोरेश्वर देवकुळे यांचे 'तोंडच्या हिशेबांचे दुसरे पुस्तक' कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात दाखल पुणे : सन १८८६ मध्ये गव्हर्नमेंट सेन्ट्रल बुक डेपो यांनी प्रकाशित केलेले रावजी मोरेश्वर देवकुळे यांचे 'तोंडच्या हिशेबांचे दुसरे पुस्तक' हा दुर्मीळ ग्रंथ लेखकाचे खापर पणतू आणि स प महाविद्यालयातील भूगोलाचे माजी प्राध्यापक अशोक मुकुंद देवकुळे यांनी मसापचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. या पुस्तकाची दु


'मसाप गप्पा' मध्ये प्राण किशोर कौल यांच्याशी गप्पा
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात पदमश्री पुरस्काराने सन्मानित ख्यातनाम काश्मिरी ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि दिग्दर्शक प्राण किशोर कौल सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्राण किशोर कौल यांचा दोन्ही संस्थांच्या वतीने विशेष सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जो


'कथासुगंध कार्यक्रमात मृणालिनी चितळे यांच्या कथांचे अभिवाचन
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखिका मृणालिनी चितळे सहभागी होणार आहेत. त्यांच्या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेन्टरचे कलावंत करणार आहे. कथेच्या अभिवाचनानंतर कथेमागची कथा मृणालिनी चितळे उलगडून दाखविणार आहेत. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. सोमवार १९ मार्च २०१८ रोजी सायं. ६.३० वा. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव


सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण : डॉ. आशुतोष जावडेकर
सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण : डॉ. आशुतोष जावडेकर मसापचे युवा साहित्य-नाट्य संमेलन उत्साहात संपन्न पुणे - प्रेम आणि खदखद व्यक्त करण्याचा अधिकार युवा पिढीला मिळायला पाहिजे, सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, आणि ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूर आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीतर्फे आयोजित युवा नाट्य साहित्य संमेलनात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी म


स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यान
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आयोजित महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंराव चव्हाण जन्मशताब्दीवर्षात महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून शंभरच्या वर व्याख्याने देणारे तसेच महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्र्याची चरित्र व त्यांच्या कार्यपध्दतीचा आणि राजकारणाचा सखोल अभ्यास असलेले ज्येष्ठ पत्रकार श्री. मधुकर भावे हे 'महाराष्ट्राचे सुवर्णपान यशवंतराव चव्