

नावीन्याच्या शोधातून जगणे अधिक परिपूर्ण
मसापतर्फे डॉ. वसंतराव पटवर्धन यांचा विशेष सत्कार पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. वसंतराव पटवर्धन यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या वेळी कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीता पवार उपस्थित होत्या. सिम्बायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला.बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लार्क ते अध्यक्षपदाची सूत्रे या प्रवासातील अनेक अनुभव, विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्तींच्या भेटीतून घेतल


आशय समजून केलेले मुद्रितशोधन जास्त महत्वाचे : डॉ. सरोजा भाटे
पुस्तकदिनाच्या निमित्ताने साहित्य परिषदेत मुद्रितशोधकांचा सन्मान
पुणे : ऱहस्व, दीर्घ, वेलांटी यांचा विचार म्हणजे मुद्रितशोधन नव्हे. आशय समजून केलेले मुद्रितशोधन जास्त महत्त्वाचे आहे असे मत संस्कृतच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सरोजा भाटे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुस्तकदिनाच्या निमित्ताने पुस्तक निर्मितीत मोलाचे योगदान देणारे गोपाळकृष्ण कुलकर्णी, विजय सरदेशपांडे, मिलिंद बोरकर, रमेश भंडारी, विजय जोशी, जयश्री हुल्याळकर, प्रा. गिरीश झांबरे, अनुश्री भागवत


साधनेशिवाय कलाकार घडत नाही : कीर्ती शिलेदार
पुणे : नाट्य संगीतावर प्रादेशिकतेचा शिक्का अकारण मारला जातो. भारतीय पातळीवर नाव मिळवायचे असेल तर नाट्यसंगीत गायचे नाही आणि जागतिक पातळीवर नाव कमवायचे असेल तर शास्त्रीय संगीत गायचे नाही. अशी मानसिकता आज तयार केली जाते आहे. त्याला तरुण पिढी बळी पडते आहे. झटपट प्रसिद्धी, लाखांची बिदागी आणि गर्दीचे आकर्षण यामुळे कलाकार साधना सोडून त्यातच रमतात. साधनेशिवाय कलाकार घडत नाही. असे मत संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मस
वार्षिक पुरस्कारासाठी आवडलेली पुस्तके मसापला कळवा
मसापचे चोखंदळ वाचकांना आवाहन पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या वार्षिक वाड्मयीन पुरस्कारासाठी आवडलेली आणि १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेम्बर २०१७ या कालावधीत प्रसिद्ध झालेली विविध वाङ्मयप्रकारातली पुस्तके वाचकांनी २० एप्रिल पर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषदेला कळवावीत असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.
प्रा. जोशी म्हणाले, 'महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुरस्कार निवडीची प्रक्रिया अधिक पारदर्शी आणि सर्वसमावेशक


परिवर्तनाच्या कवितेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त मसापच्या वतीने अभिवादन करण्यासाठी 'परिवर्तनाच्या कविता' हा कार्यक्रम आयोजित केला होता. सुप्रसिद्ध कवी डॉ. मनोहर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले. प्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर, शाहीर बाबा जाधव, अंकुश आरेकर, वि. दा. पिंगळे व अनिल साबळे हे कवी सहभागी होते. सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनासाठी डॉ. आंबेडकरांनी सम्पूर्ण आयुष्य समर्पित केले. पाच हजार वर्षांपासून असलेली जातीयता विषमतेला मोठे खिंडार पाडण्याचे का


मुलांना चुका करू द्या आणि त्या चुकांमधून शिकू द्या : राजीव तांबे
मुलांना चुका करू द्या आणि त्या चुकांमधून शिकू द्या : राजीव तांबे सर्जनशील सुट्टी या साहित्य परिषदेच्या कार्यशाळेला पालकांचा तुफान प्रतिसाद पूणे : ज्या गोष्टी शाळा सुरु असताना करता येत नाहीत त्या करण्यासाठी सुट्टी असते. पण पालक सुट्टीतही मुलांना अकारण गुंतवून ठेवतात. त्यामुळे मुलांना सुट्टीचा आनंद उपभोगता येत नाही. मुलांना शिकवू नका, त्यांना अनुभवातून शिकू द्या. मुलांना चुका करू द्या आणि त्या चुकांमधून शिकू द्या, असा सल्ला बालकुमारांसाठी लेखन करणारे प्रसिद्ध साहित्यिक राजीव ता


विकासाच्या नावाखाली शहरे निसर्गाला गिळंकृत करताहेत : डॉ. अनिल अवचट
पुणे : विकासाच्या नावाखाली निसर्गाचे जे शोषण सुरु आहे ते चिंताजनक आहे. शहरे निसर्गाला गिळंकृत करत आहेत. असे मत डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, प्रख्यात इतिहास संशोधक कै. शं. ना. जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार अर्चना जगदीश यांच्या 'नागालँडच्या अंतरंगात' या पुस्तकाला डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होत. व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. डॉ


'महाराष्ट्र साहित्य परिषदेने' केले ज्ञानकोशकार केतकरांना अभिवादन
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यकंटेश केतकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केतकरांच्या कमला नेहरू उद्यानातील स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण केला. या वेळी मसापचे कार्यवाह दीपक करंदीकर, लेखक शाम भुर्के, ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीचे वसंत जोशी, प्रकाश भोंडे, दिलीप जोशी उपस्थित होते. प्रा. जोशी म्हणाले, 'ज्ञानाधिष्ठीत समाजरचनेचे स्वप्न डॉ. श्रीधर व्यंकट


महामंडळ साहित्याचे उत्तराधिकारी नाही : अरुण म्हात्रे
पुणे: 'साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ठरविण्याचा महामंडळाला काय अधिकार आहे? कुठलेही सभासद असलेले महामंडळ म्हणजे काँग्रेस कमिटी किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. महामंडळ या संस्थेलाच आमचा विरोध आहे. निर्णय घेणारे महामंडळ कोण? महामंडळ हे मराठी साहित्याचे उत्तराधिकारी नाही,' अशा शब्दांत प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी सोमवारी साहित्य महामंडळावर तोफ डागली. 'अध्यक्षपदासाठी मते मागणे योग्य नाही. हे पद सन्मानानेच दिले पाहिजे,' असे मत प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांनी मांडले.महाराष्ट्र साह
साहित्यिकांना साहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने द्या
साहित्यिकांना साहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने द्या
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण ठराव
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता अध्यक्षपद सन्मानाने ज्येष्ठ साहित्यिकाला देण्यात यावे, यासाठी आद्य साहित्य संस्था म्हणून महामंडळात साहित्य परिषदेने आग्रही भूमिका घ्यावी, असा महत्वपूर्ण ठराव नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. सातारा जिल्हा प्रति