

आपल्याकडे सांस्कृतिक अभिज्ञता नाही : डॉ. अरुणा ढेरे
साहित्य परिषदेने राजेंद्र बनहट्टी गौरव व्याख्यानमाला पुणे : आज आपण स्त्री आणि सृष्टी या दोघींवरही अत्याचार करीत आहोत. आपल्याकडे संस्कृतीकडे पाहण्याचा, परंपरा नीट समजून घेण्याचा कोणताही निरोगी दृष्टीकोन नाही. जशी आपल्याकडे ऐतिहासिक अभिज्ञता नाही, तशी सांस्कृतिक अभिज्ञताही नाही. असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या राजेंद्र बनहट्टी गौरव व्याख्यानमालेत 'सृष्टी आणि स्त्री' या विषयावर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पर
वाचकांचा कौल
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेने यंदा प्रथमच त्यांच्या तर्फे देण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारासाठी वाचकांचा सहभाग घेतला. त्यात १००७ वाचकांनी सहभाग घेतला. ३५ वाचकांनी पत्रे पाठवून तर ९७२ वाचकांनी मेलद्वारे आपल्या आपल्या आवडीची पुस्तके कळविली. त्याचे सर्वेक्षण करून मसापने वाचकांच्या अभिप्रायाचा कल अजमावण्याचा प्रयन्त केला आहे. १०% वाचकांनी ललित साहित्याची (कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णने) आवडती पुस्तके कळविली. २१ % वाचकांनी चरित्र / आत्मचरित्र या प्रकारातील पुस्तके कळविली.
२६ आणि २७ मे रोजी 'मसाप' चा ११२ वा वर्धापनदिन
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित लेखिका प्रतिभा राय यांच्या हस्ते होणार ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कारांचे वितरण पुणे : महाराष्ट्रातील साहित्य संस्थांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११२ वा वर्धापनदिन समारंभ २६ आणि २७ मे रोजी साजरा होणार आहे. २६ मे रोजी सायं ६ वाजता ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कराचे वितरण ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित उडिया भाषेतील प्रसिद्ध लेखिका प्रतिभा राय यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा समारंभ साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या


डॉ. प्रभाकर मांडे यांना 'मसाप जीवनगौरव' आणि राजा शिरगुप्पे यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता
२७ मेला होणार वितरण
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 'मसाप जीवनगौरव पुरस्कार लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांना जाहीर झाला आहे. वाङमयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार विद्रोही साहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि सीमाभागातील कार्यकर्ते लेखक प्रा. राजा शिरगुप्पे यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. २७ मे रोजी परिषदे


रसिकांच्या आनंदासाठी हास्यकविता : बंडा जोशी, स्वाती सुरंगळीकर
रंगली 'एक कवयित्री एक कवी' मैफल नवी पुणे : आजच्या संघर्षमय जीवनात माणसं निर्मळ आनंदापासून दूर गेली आहेत. रोजच्या जगण्यातले ताणतणाव वाढत चालले आहेत. माणूस एकाकी होत आहे. मनातल्या आनंदाचा कोपरा रिकामा होत आहे. अशावेळी विनोद आणि हास्य फारच महत्वाचे आहे. रसिकांना हा आनंद देण्यासाठी आम्ही हास्यकविता, एकपात्री, विडंबन विनोदातून लोकांचे मनोरंजन करतो. रसिकांच्या आनंदासाठीच आम्ही हास्यकविता लिहितो. असे मत हास्यकवी बंडा जोशी आणि स्वाती सुरंगळीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य पर


'मसाप' तर्फे ६ मेला विनोद-साहित्य-आनंद मेळ्याचे आयोजन
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि लायन्स क्लब औंध-पाषाण यांच्या सयुंक्त विद्यमाने जागतिक हास्यदिनाच्या निमित्ताने विनोद-साहित्य- आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार ६ मे रोजी सायं. ५. ३० ते ८ या वेळेत एस. एम. जोशी
सोशलिस्ट फाऊंडेशनच्या सभागृहात होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि लायन्स क्लब औंध-पाषाणचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली. या कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते होणार आहे. प्