

हरिभाऊंनी मराठी वाङ्मयात आपटे पर्व निर्माण केले : लक्ष्मीकांत देशमुख
'स्मरण युगप्रवर्तक कादंबरीकाराचे' मधून ह. ना. आपटेना अभिवादन पुणे : हरिभाऊं मराठी सामाजिक कादंबरीचे जनक आहेत. रंजन प्रधान साहित्यात रमलेल्या मराठी साहित्य विश्वाला हरिभाऊंनी बाहेर काढले मराठी कादंबरीला त्यांनी सामाजिक आशय दिला हरिभाऊंनी मराठी वाङ्मयात आपटे पर्व निर्माण केले असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. ह. ना. आपटे स्मृतिशताब्दीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि आनंदाश्रम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने आयोजि
मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी पुढाकार घ्या
'मसाप' चे शाळा आणि पालकांना आवाहन पुणे : मुलांमध्ये साहित्याची आवड आणि वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून शाळांनी आणि पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेने शाळांना आणि पालकांना केले आहे.
परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'मुलांच्या गतिमान जीवनशैलीत खेळाला आणि अवांतर वाचनाला अजिबात स्थान नाही. या मुलांमध्ये वाचनाविषयीची आणि साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शाळांनी आण


संस्कृत वाङ्मयाचा परिचय सोप्या भाषेत करून द्यावा : पं. वसंतराव गाडगीळ
पुणे : संस्कृत भाषेतले वेद आणि वाड्मय हा मानवाला मिळालेला समृद्ध वारसा आहे आणि तो केवळ घोकंपट्टी करून पाठ करण्यापेक्षा सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत न्यायला हवा. असे मत ज्येष्ठ संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, संशोधनात्मक लेखनासाठी असलेल्या 'कै. कृष्ण मुकुंद (उजळंबकर) स्मृती पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार 'सामवेदी बोली-संरचना आणि स्वरूप' या ग्रंथासाठी विरारचे डॉ. नरेश नाईक याना प्रदान करण्