

भाषेची गंमत कळण्यासाठी भाषेशी खेळायला शिका : डॉ. न. म. जोशी
मसाप तर्फे अक्षरयात्री पुरस्कार प्रदान पुणे : 'केवळ पाठयपुस्तकांचा अभ्यास करून मराठीत चांगले गुण मिळाले म्हणून भाषा समजत नाही. भाषेची गंमत करण्यासाठी भाषेशी खेळायला शिका भाषेचा क्रीडा व्यवहार वाढला पाहिजे असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले. माध्यमिक शालान्त परीक्षेत मराठी विषयात प्रथम व द्वितीय आलेल्या ऐश्वर्या म्हस्के आणि योगिता मगर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अक्षरयात्री पुरस्कार प्रदान कर


योगिता मगर व ऐश्वर्या म्हस्के या विद्यार्थिनींना मसापचा अक्षरयात्री पुरस्कार जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे यावर्षीपासून माध्यमिक शालान्त परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या दोन विद्यार्थांना अक्षरयात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. योगिता मगर (जिजामाता विद्यालय, सराटी, ता. इंदापूर, जिल्हा पुणे) व ऐश्वर्या म्हस्के ( माउंट कार्नेल कॉन्व्हेंट हायस्कुल, लुल्लानर, पुणे) हे या वर्षीच्या पुरस्कारांचे मानकरी आहेत. रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार अक्षरयात्री या संस्थेने महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दिलेल्


'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात आश्लेषा महाजन आणि मीरा शिंदे साधणार विद्यार्थ्यांशी संव
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन आणि मीरा शिंदे सहभागी होणार आहेत. कर्वे रोड वरील सेंट क्रिस्पिन्स होम कन्या शाळेतील विद्यार्थिनींशी त्या संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्याध्यापिका माधवी सॅम्युअल, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम सोमवार दि. ३० जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक माध


'मसाप गप्पा' मध्ये डॉ. माधव गाडगीळ यांच्याबरोबर गप्पा
पुणे : आपल्या सोप्या आणि सहजसुंदर शैलीतून विज्ञान विषयक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ महाराष्ट्र्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी पर्यावरण अभ्यासक डॉ. वर्षा गजेंद्रगडकर संवाद साधणार आहेत. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक ७ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६.३
रसिक प्रेक्षकांवर बरसले कवितांचे घन
मसापत रंगला 'एक कवियित्री एक कवी कार्यक्रम पुणे : ढगांशी लपाछपी खेळणारा पाऊस... विविधरंगी सुरेख सायंकाळ... पाऊस आणि कवितेचं मनाला भावणारे समीकरण... वारीचा अनुपम सोहळा आणि जगण्यातली गंमत सांगणारी सभागृहात होणारी शब्दबरसात, अशा सुंदर वातावरणात रसिकांवर कवितांचे घन बरसले. स्पृहा जोशी यांनी 'माझ्या मनाची पालखी, कुण्या वारीला निघाली', 'एका वेळी कसे मिळावे मनास वेड्या सारे काही', सूर बहुतेक असतात मध्यमवर्गीयांसारखे', 'या साऱ्यातून मी गेल्यावर माझ्यानंतर' अशा कवितांतून आयुष्याचे मर्


साहित्य परिषदेत पंच्याहत्तर वर्षानंतर घुमला वामन मल्हार जोशींचा आवाज
पुणे : तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र या विषयाचे नामवंत प्राध्यापक ... महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सहकारी ... विश्ववृत्त मासिकाचे संपादक ... रागिणी, आश्रमहरिणी, सुशीलेचा देव, इंदू काळे आणि सरला भोळे या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक... मसापचे माजी कार्याध्यक्ष ... १९३० साली मडगाव (गोवा) येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वामन मल्हार जोशींचा आवाज पंच्याहत्तर वर्षानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ऐकण्याची संधी साहित्य रसिकांना मिळाली आणि रसिक क्षणभर भा


अण्णाभाऊंनी मराठी साहित्य भूमीत समाजपरिवर्तनाचा विचार पेरला : प्रा. मिलिंद जोशी
साहित्य परिषदेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन पुणे : 'अण्णाभाऊ साठे यांचे संबंध साहित्यच हे विद्रोही तत्वज्ञानावर उभे आहे. हे विद्रोही तत्वज्ञान त्यांना मावर्स, गॉर्की, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या कडून मिळाले. या विद्रोही तत्वज्ञानातून प्रेरणा घेऊन अण्णाभाऊंनी मराठी साहित्याच्या भूमीत समाजपरिवर्तनाचा विचार पेरला असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि दलित साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमा