

मसाप गप्पा मध्ये डॉ. जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांच्यासोबत गप्पा
पुणे : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि आपल्या कसदार लेखनाने मराठीतील विज्ञान साहित्याचे दालन समृद्ध करणारे प्रसिद्ध लेखक डॉ. जयंत नारळीकर आणि प्रसिद्ध लेखिका मंगला नारळीकर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मसाप गप्पा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी लेखिका चित्रलेखा पुरंदरे संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक ४ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती मसापचे कार्य


मराठीच्या 'अभिजात' दर्जासाठी मसाप न्यायालयात जाणार
कार्यकारी मंडळात आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय पुणे : सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होऊनही अद्याप केंद्रशासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. याबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून मसापने लोकचळवळ उभी केली. पंतप्रधानांना एक लाखांहून अधिक पत्रं पाठवली, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी आग्रही भूमिका घ्यावी यासाठी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. २६ जानेवारीला राजधानी दिल्लीत जाऊन आवाज उठवला. मसा


चाकोरीबाहेरच्या लेखनाचा उचित सन्मान : विद्या बाळ
प्रा. उषा तांबे याना मसापचा कै. डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार पुणे : धरणाची निर्मिती, रेल्वे, सागरी सेतू अशा स्थापत्य अभियांत्रिकी सारख्या चाकोरीबाहेरच्या विषयांवर लिहिणाऱ्या लेखिका अभावानंच आढळतात. याशिवाय कथालेखन, अनुवाद असं वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या प्रा. उषा तांबे यान हा पुरस्कार मिळणं हा उचित सन्मान आहे. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे यांना यावर्षीचा महाराष्ट्र सा


बुलेट ट्रेन महत्वाची की सार्वजनिक आरोग्य?: डॉ. अभिजित वैद्य
डॉ. यशवंत तोरो यांना 'मसाप' चा पुरस्कार पुणे : बुलेट ट्रेनसाठी १.२५ लाख कोटी रुपये खर्च केले जातात. केंद्र सरकार आणि सर्व राज्यसरकारांची सार्वजनिक आरोग्यासाठीची मिळून तरतूद फक्त दोन लाख कोटी रुपये आहे. ज्यांच्यासाठी प्रगती आणि विकास करायचा त्यांच्या आरोग्यबाबतची सरकारची उदासीनता ही असंवेदनशीलताच आहे. बुलेट ट्रेन महत्वाची की सार्वजनिक आरोग्य? असा सवाल ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ आणि राष्ट्रीय आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या


शासकीय परिभाषा कोश दुर्बोध
डॉ. माधव गाडगीळ यांची टीका शासकीय परिभाषा कोश हे प्रत्येकाने वाचले पाहिजेत, म्हणजे कोणते शब्द वापरू नयेत याची माहिती मिळते. एकूणच शासकीय परिभाषा कोष दुर्बोध आहेत, अशी टीका ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ आणि लेखक डॉ. माधव गाडगीळ यांनी मंगळवारी केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'मसाप गप्पा' मध्ये लेखिका वर्ष गजेंद्रगडकर यांनी गाडगीळ यांच्याशी संवाद साधला. माझ्या लेखनावर इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत यांच्या लेखनाचा प्रभाव असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.
'गेम थिअरी' या शब्दाला


प्रा. उषा तांबे यांना 'मसाप'चा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर
पुणे : मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे यांना यावर्षीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवार दि. १४ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रा. उषा तांबे यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. जोगळेकर यांच्या


महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. विलास शंकर रानडे पुरस्कार जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या वतीने, दरवर्षी क्रीडा/वैद्यकविषयक उत्कृष्ट ग्रंथाला डॉ. शकुंतला क्षीरसागर पुरस्कृत, मानाचा असा कै. विलास शंकर रानडे स्मृतिपुरस्कार दिला जातो. यावर्षीच्या पुरस्करासाठी, डॉ. यशवंत तोरो (सांगली), लिखित 'कॅन्सर -निदान, उपचार व प्रतिबंध' या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. डॉ. मनोज देशपांडे आणि पत्रकार अमोल मचा ले यांच्या निवड समितीने या ग्रंथाची निवड केली आहे. रु. ५०००/- आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार समारंभ, शुक


ना. सी. फडकेंच्या साहित्याचा करिष्मा चिरंतन : शि. द. फडणीस
'मसाप' तर्फे ना. सी. फडके यांना १२५ व्या जयंतीनिमीत्त अभिवादन पुणे : आप्पासाहेब म्हणजेच आमचे ना. सी. फडके यांनी आपल्या साहित्यातून एक करिष्मा निर्माण केला, हा करिष्मा अजूनही चिरंतन आहे, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने साहित्यिक ना. सी. फडके यांच्या सव्वाशेव्या जयंती वर्षाच्या निमित्ताने आयोजित 'स्मरण आप्पांचे' या कार्यक्रमात सुनिधी पब्लिकेशनने काढलेल्या आणि ना. सी. फडके यांच्या कन्या गीतांजली जोशी यांनी संपादित