

नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांचा जाहीर सत्कार समारंभ
पुणे : डॉ. अरुणा ढेरे यांची यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात येणार आहे. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहे. प्रमुख वक्त्या म्हणून ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी उपस्थित राहणार आहेत. गुरुवार दिनांक ०१ नोव्हेंबर २०१८


लेखकाने संवेदनशील असणे आवश्यक - मोनिका गजेंद्रगडकर
साहित्यसेतू आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ऑक्टोबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या "कथालेखन कसे करावे?" या कार्यशाळेमध्ये, राज्यभरातून आलेल्या साठ नवोदित लेखकांना, डॉ. न. म. जोशी, मोनिका गजेंद्रगडकर, भारत सासणे, मंगला गोडबोले, प्रा. क्षितिज पाटुकले, सुनिताराजे पवार, निलिमा बोरवणकर यांनी मार्गदर्शन केले तुम्ही संवेदनाशील आहात का ? तुम्हाला आयुष्याला भिडता येते का ? तुम्हाला माणसे वाचता येतात का ? तुम्हाला जीवनाबद्दल कुतुहल आहे का ? तुम्ही अन


मी जब्बारची नावडती राणी : डॉ. मोहन आगाशे
पुणे : 'मी जब्बारची नावडती राणी होतो. विद्याधर वाटवे आणि नंतर मोहन गोखले हे त्याचे आवडते नट. त्यामुळे चांगल्या भूमिकांना मी कायम मुकायचो.' 'तरुण असूनही म्हाताऱ्यांच्या भूमिका करायला लागल्या त्या जब्बारमुळेच'. 'आता तर एरव्ही लेखन करणारा सतीश आळेकरही चित्रपटांमधून उत्तम भूमिका करून माझ्या पोटावर पाय देऊ लागला आहे. 'व्हेंटिलेटर' हा चित्रपट मी नाकारल्यामुळे त्याला मिळाला, असे तो सांगत फिरतो. पण खरेतर मीच त्याचे नाव सुचवले होते, हे मात्र सांगत नाही.' या सगळ्या एकापाठोपाठ एक येणाऱ्


पुस्तकांमुळे मने प्रज्वलित होतात : प्रा. मिलिंद जोशी
वाचन प्रेरणा दिनानिमित्त भावे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद पुणे : 'पुस्तके केवळ मनोरंजन करीत नाहीत, ती माणसांचे भावविश्व ढवळून काढतात. अनोखे अनुभव देतात. वेदनेवर फुंकर घालतात. जाणिवांचा परिघ विस्तारतात. जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. पुस्तके मनावर साठलेले निराशेचे मळभ दूर करून मने प्रज्वलित करतात. असे मत महाराष्ट्र परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पेरूगेट भावे हायस्कूल यांच्यावतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आय


लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त : डॉ. श्रीपाद जोशी
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यसेतू पुणे आयोजित लेखन कार्यशाळेचे उदघाटन पुणे : लेखन आणि साहित्यनिर्मिती ही एक सृजनात्मक प्रक्रिया आहे. लेखक जोपर्यंत अंतर्बाह्य ढवळून निघत नाही, विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात नाही, वेगवेगळ्या जाणीवांची, अनुभवांची बेरीज करीत नाही तोपर्यंत सकस साहित्यकृती निर्माण होणार नाहीत. लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त आहेत असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केल


लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त - डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त - डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे व आणि साहित्य सेतू आयोजित आठ लेखन कार्यशाळांच्या मालिकेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते १४ ऑक्टोबर २०१८ रोजी करण्यात आले. लेखन आणि साहित्यनिर्मिती ही एक सृजनात्मक प्रक्रिया आहे. लेखक जोपर्यंत अंतर्बाह्य ढवळून निघत नाही, विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात नाही, वेगवेगळ्या जाणीवांची, अनुभवांची ब


कविता बदलली तरच समाज बदलेल : आमदार मेधा कुलकर्णी
मसाप मध्ये 'कविता दुर्गेच्या'कार्यक्रमात उलगडली स्त्री जाणिवेची बदलती विविध रूपे पुणे : 'पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणे यापेक्षा कर्तृत्वाने खांदा उंच करून जगणे साहित्यात आले पाहिजे. बदलणाऱ्या जगाबरोबर कवितेतले अनुभव स्त्रीला बदलता आले पाहिजेत. कविता बदलली तरच समाज बदलेल असे मत आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कवयित्री संमेलनात त्या बोलत होत्या. यावेळी


गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण
'मसाप गप्पा' या कार्यक्रमात 'पुत्र सांगती'मध्ये अनेक आठवणींना मिळाला उजाळा पुणे : 'गीतरामायण कार्यक्रमाच्या रॉयल्टीवरून बाबूजी आणि गदिमा यांच्यामध्ये दुरावा वाढला. त्यांचा संवाद बंद झाला. महाराष्ट्राचे खूप नुकसान होईल, असे प्रत्येकजण म्हणू लागला. दरम्यान, सैनिकांच्या कल्याण निधीसाठी पुण्यात एका कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. यशवंतराव आणि गदिमा यांचे मैत्र 'चले जाव'चळवळीपासूनचे. त्यांनी एकमेकांना बघताच घट्ट मिठी मारली. यशवंतरावांनी बाबूजींनाही


अज्ञात शरद जोशी लोकापर्यंत पोहोचवणे ही लेखन प्रेरणा : वसुंधरा काशीकर
' शरद जोशींना समजून घेताना' या मुलाखतीत प्रतिपादन, मसापतर्फे आयोजन पुणे : महापुरुषांच्या कर्तृत्वाचा वेध इतिहास घेत असतोच, पण त्या महापुरुषामधील माणसाचा शोध घेणे, त्याचे गर्दीतील एकटेपण, भावभावना, संवेदनशीलतेचा शोध घेणे हा साहित्याचा विषय आहे. वक्ता, लेखक, साहित्याचे अभ्यासक असे शरद जोशींच्या व्यक्तीमत्वाचे अज्ञात पैलू लोकांपर्यंत पोहोचावे ही या लिखाणामागची प्रेरणा होती असे प्रतिपादन 'शरद जोशी-- शोध अस्वस्थ कल्लोळाचा' (राजहंस प्रकाशन) या पुस्तकाच्या लेखिका वसुंधरा काशीकर यांन


मराठी समीक्षा वाचकप्रेमी नाही - डॉ. आशुतोष जावडेकर
‘मसाप’च्या ‘वा म्हणताना!’ कार्यक्रमात पुणे बुक फेअर मध्ये मुलाखत मराठी समीक्षा वाचकप्रेमी नाही - डॉ. आशुतोष जावडेकर ‘मसाप’च्या ‘वा म्हणताना!’ कार्यक्रमात पुणे बुक फेअर मध्ये मुलाखत पुणे - मराठी समीक्षक वाचकांना अजिबात महत्त्व देत नाहीत. त्यांचे वाचकांवर प्रेम नाही.अभ्यास आणि आस्वाद यांचा अंतर्भाव असलेली समीक्षा मराठीत अपवादानेच लिहिली गेलीआहे. मराठी समीक्षकांना साहित्यकृतीच्या अंतरंगापर्यंत वाचकांना घेऊन जाण्यातअजिबात स्वारस्य नाही त्यांना आपल्या तथाकथित पांडित्याचे दर्शन घडव