पंढरपूर येथे एक डिसेंबरला मसापचे समीक्षा संमेलन अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि प्रा. वसंत आबा
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पंढरपूर व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवार दि. ०१ डिसेंबर रोजी एक दिवसीय समीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उदघाटन प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार भारतनाना भालके, आमदार दत्तात्रय


मराठी साहित्याला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समृद्ध, सजस व अजरामर करण्यासाठी व लोकशाहीला बळकट करण्यास
साहित्यसेतू आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 25 नोव्हेंबर 2018 रोजी आयोजित करण्यात आलेल्या "ब्लॉगलेखन कसे करावे?" कार्यशाळेत पुण्यात नुकतीच " ब्लॉगलेखन कार्यशाळा" संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व वयोगटातील लोकं सहभागी झाले होते. जेष्ठ पत्रकार *भाऊ तोरसेकर* यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ब्लॉग लिहिताना सुटसुटीत लिहिता येणं महत्त्वाचं, अलंकारिक नको. समोरचा माणूस वाचताना वेळ देत असतो ,म्हणून लिहिताना गंभीरपणा आवश्यक आहे. लिहिन्यात काही उदाहरणे, गोष्


अन पत्रातून उलगडले 'पुलंचे पोस्टिक जीवन
पुणे : माझ्यावरील प्रेमापोटी लोक पोस्टात जातात... कार्ड आणि पाकीट विकत घेतात... शक्ती, वेळ आणि पैसा खर्च करून पत्र पाठवतात... त्यांच्या पत्राची दखल न घेणं हे मला कृतघ्नपणाचे वाटतं म्हणूनच आलेल्या नव्वद टक्के पत्रांना मी उत्तर दिली असं म्हणत सामान्य रसिकांपासून ते दिग्गज कलावंतापर्यंत सर्वांशी पत्राच्या माध्यमातून मैत्र जोडणाऱ्या 'पुलंचे पोस्टीक जीवन' पुलोत्सवात उलगडले आणि उपस्थित रसिकांनी तो मंतरलेला काळ पुन्हा अनुभवला. पुलंनी लिहिलेल्या आणि पुलंना आलेल्या निवडक पत्रांचे अभिव


अनुवादाअभावी पुलंचे साहित्य प्रादेशिक मर्यादेत अडकले
परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केली खंत पुणेः- ''जीवनातील नवरसांना आपल्या प्रतिभेची जोड देत योग्य ठिकाणी मार्मिक टिपणी करून हसवता हसवता डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या पुलंच्या भाषा प्रभुत्वाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. पण आपल्या साहित्यातून जगाची सफर घडविणाऱ्या पु.लं.चे साहित्य हे अनुवादाअभावी प्रादेशिक मर्यादेत अडकले'' अशी खंत मान्यवरांनी आज परिसंवादात व्यक्त केली. निमित्त होते ’पु. ल. परिवार’ आणि ’आशय सांस्कृतिक’च्या वतीने आणि ’स्क्वेअर १’च्या सहयोगाने आयोजित पुलोतत्सवात आ


पुढारलेपणाच्या नावाखाली वृत्तपत्रांनी व साहित्यिकांनी इंग्रजाळलेल्या मराठीचा वापर सुरू केल्यामुळे म
पुढारलेपणाच्या नावाखाली वृत्तपत्रांनी व साहित्यिकांनी इंग्रजाळलेल्या मराठीचा वापर सुरू केल्यामुळे मराठी भाषेच्या मूळ अस्तित्वाला धोका निर्माण झाला असून साहित्यिकांनी मराठी भाषेप्रती आपली जबाबदारी ओळखून त्यांच्या साहित्यामध्ये संशोधनपूर्णरित्या मराठी शब्दांचा वापर करावा असे आवाहन, मराठी काका अनिल गोरे यांनी रविवार, 18 नोव्हेंबर रोजी मसाप - साहित्य सेतू पुणे आयोजित "कादंबरीलेखन" कार्यशाळेत व्यक्त केले. या प्रसंगी मसाप पुणे चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे व साहित्य सेतूचे संस
यवतमाळ साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शन गाळ्यांसाठी आणि प्रतिनिधींसाठी १५ नोव्हेंबर २०१८ पासून नोंद
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ११, १२ आणि १३ जानेवारी,२०१९ रोजी यवतमाळ येथे होत आहे. या संमेलनात प्रकाशकांना व पुस्तकविक्रेत्यांना ग्रंथ प्रदर्शनात गाळा / गाळे मिळण्यासाठीचे अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उपलब्ध आहेत. गाळे आरक्षणासाठी नोंदणी शुल्क रु. ६५००/- आहे. गाळ्यासाठी नोंदणी १५ नोव्हेंबर,२०१८ पासून ते दि. १५ डिसेम्बर, २०१८ पर्यंत रोख शुल्कासह किंवा डी. डी. स्वरूपा


नियोजित अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीबाबत सुनावले खडे बोल
पुणे : 'वाङ्मयीन संस्कृतीची पडझड होत होती. साहित्य क्षेत्रात अपप्रवृत्ती शिरत होती. लोकांना बदल हवा होता. पण, समाजाने चांगल्या माणसांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवले. हा आपला करंटेपणाच आहे,' अशा शब्दांत साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी गेल्या काही वर्षांतील संमेलनाध्यक्षाच्या निवड प्रक्रियेवरून आणि निवडीवरून गुरुवारी खडे बोल सुनावले. यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सन्मानाने निवड झाल्याबद्द