

मराठी सापडली विचित्र तावडीत : प्रा. हरी नरके मराठी राजभाषादिनी मसापमध्ये पुरस्कार वितरण
पुणे : सध्याचे राज्यकर्ते भाषाप्रेमी, कलाप्रेमी असतील, असे वाटले होते पण गेल्या साडेचार वर्षात अभिजात दर्जाबाबत काहीच घडले नाही. राजकीय इच्छाशक्तीच मेलेली असल्याने ही परिस्थिती उदभवली आहे. भाषा धोरण, मराठी विद्यापीठ, अभिजात दर्जा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पाच वर्षात मराठी विचित्र तावडीत सापडली आहे. असा टोला साहित्यिक, विचारवंत प्रा. हरी नरके यांनी लगावला.यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होत्य


'नमन वीरतेला' या कार्यक्रमातून 'मसाप' मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
पुणे : 'नमन वीरतेला', नमन शूरतेला, नमन मृत्युंजयवीराला, अशा खणखणीत आवाजात पोवाडे सादर करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना ५३ व्या पुण्यतिथीनिमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'नात' शाहीर विनता जोशी आणि सहकारी यांच्या 'नमन वीरतेला' या कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले होते. शाहीर विनता जोशी यांनी सावरकरांचे अद्भुत जीवनकार्य पोवाड्यातून उभे केले. येसूवहिनीला पाठवलेले पत्र त्यांनी क्रांतीकार्याचे घेतलेले