

करुणा गोखले, राधिका टिपणीस आणि जोत्स्ना प्रकाशन यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे रेखा ढोले पुरस्कार
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने, राजहंस प्रकाशनाच्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या, श्रीमती रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी मराठी अनुवाद क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा पुरस्कार ज्येष्ठ अनुवादक करुणा गोखले याना जाहीर झाला आहे. रु. २५०००/- व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्व


ग्रामीण भागात अस्सल कथाबीजे मिळतात : बबन पोतदार
पुणे : आपल्या आजुबाजूला कथेचे अनेक विषय लेखकाला सापडतात. प्रामुख्याने खेड्यातले ग्रामीण भागात लोकांचे दारिद्र्य, गरिबी, उपासमार, हाल अपेष्टा व्यसनाधिनता आणि चंगळवाद, दादागिरी या संदर्भातली पुष्कळ कथाबीज लेखकाला मिळतात. स्त्री आणि पुरुषांची टोकाची मानसिकता ग्रामीण भागात जास्त प्रमाणात पाहायला मिळते. मुळातच स्त्री ही सोशिक व सहनशील असते. काळीज पोखरून टाकणारे बरे वाईट प्रसंग आणि त्यातून निष्पन्न होणारी अस्सल कथाबीजे माझा स्वतःचा अनुभव आहे. बालपण सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावी ग


जागतिक महिला दिन हा साजरा करण्याचा दिवस नाही, तो आत्मचिंतनाचा दिवस आहे : डॉ अश्विनी धोंगडे
पुणे : जागतिक महिला दिन हा महिलांनी स्वतःविषयी आणि स्वतःच्या परिस्थितीविषयी गांभीर्याने विचार करण्याचा दिवस आहे. आज महिला दिनाच्या सोशल मिडीयावर पावसासारख्या शुभेच्छा पडत आहे. शुभेच्छा देऊन जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखे त्यांना वाटते ही अतिशय चिंतनीय बाब आहे. जागतिक महिला दिन हा साजरा करण्याचा दिवस नाही तर तो आत्मचिंतनाचा दिवस आहे. असे मत डॉ अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त 'स्त्री एक 'अ'क्षर ओळख' या कार्यक्रमाचे


'मसाप' करणार डॉ. सरोजिनी बाबर आणि प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सा
पुणे : लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर आणि ज्येष्ठ कादंबरीकार समीक्षक त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा विसर महाराष्ट्र शासनाला पडला असला तरी या सारस्वतांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रभर त्यांच्या साहित्याचा जागर मसापच्या शाखांच्या माध्यमातून करण्यात येईल असा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. मसापच्या कार्यकारी मंडळ


विज्ञान साहित्याची चळवळ उभा राहावी : डॉ. फुला बागुल
'मसाप' व 'मविप' यांच्यातर्फे विज्ञान दिनानिमित्त व्याख्यान पुणे : “विज्ञान कथांमधून विज्ञान शोधाची प्रेरणा मिळते. मराठी विज्ञान साहित्यामध्ये अनेक संभवनीयता आहेत. या संभवनीयतेला अनेक आयाम आणि पैलू आहेत. आजच्या संभवनीयता उद्या वैज्ञानिक क्रांतीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. त्यामुळे विज्ञान साहित्याची चळवळ उभी राहून नवनवीन विज्ञान साहित्य निर्माण व्हावे,”.असे प्रतिपादन धुळे येथील एस. पी. डी. एम. महाविद्यालयातील संशोधक प्राध्यापक डॉ. फुला बागुल यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद