

दुःखात गाणं असतं, दुःख सुंदर नसतं : डॉ. वीरा राठोड
मसापमध्ये 'एक कवी एक कवयित्री' कार्यक्रम पुणे : 'बोली भाषेवर जन्मापासून प्रेम आहे. सगळ्या बोलीभाषा श्रेष्ठ आहेत. त्यात एक सुगंध आहे. सुगंधाचा अनुवाद करता येत नाही. लोकगीतं जगण्याच्या अनुभवातून जन्मलेली असतात. या लोकगीतांच्या चोऱ्या खूप होतात. अनेक नामवंत कवींनी लोकगीतांच्या चोऱ्या करून ती कविता म्हणून स्वतःच्या नावावर छापल्या आहेत. मला काही मिळावे म्हणून मी कविता लिहीत नाही. दुःखात गाणं असतं, दुःख सुंदर नसतं.' असे मत डॉ. वीरा राठोड यांनी व्यक्त केले. मसापच्या 'एक कवी एक कवयित


जिथे शब्द पोहचू शकत नाही तिथे चित्रं पोहचतात : शि. द. फडणीस
साहित्य परिषदेत पुस्तकदिनाच्या निमित्ताने शि. द. फडणीस यांच्या हस्ते चित्रकारांचा सन्मान पुणे : एकेकाळी पुस्तकांमध्ये शिल्लक असलेल्या जागेत चित्रांचा समावेश केला जायचा पण आता चित्र ही भाषा आहे हे साहित्य विश्वाला पटले आहे. जिथे शब्द पोहचू शकत नाही तिथे चित्र पोहचतात असे मत ज्येष्ठ चित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले. जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेत यावर्षी मराठी साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणारे प्रसिद्ध चित्रकार नाना जोशी, ल. म. कडू, चंद्रम


सर्जनशील साहित्यप्रकार असलेला अनुवाद ही कला : डॉ. अरुणा ढेरे
पुणे : सर्जनशील साहित्यप्रकार असलेला अनुवाद ही कला आहे, असे मत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, राजहंस प्रकाशन आणि ढोले परिवारातर्फे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते अनुवाद क्षेत्रातील योगदानाबद्दल करुणा गोखले याना 'बालाचा बेडूकमित्र आणि इतर' या पुस्तकाचे निर्मितीमूल्य, मुखपृष्ठ व अंतर्गत सजावटीबद्दल राधिका टिपणीस याना आणि हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या ज्योत्स्ना प्रकाशनला रेखा ढोले स्मृतिपुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी ढेर


मराठीतील पीएचडी साठीच्या प्रबंधांची गुणवत्ता खालावते आहे : डॉ. मनोहर जाधव यांची खंत
डॉ. गीतांजली घाटे यांना कृष्णमुकुंद पुरस्कार प्रदान पुणे : आज पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. संशोधनासाठी परिश्रम घेण्याच्या अभावामुळे पीएचडी साठीच्या प्रबंधांची गुणवत्ता मात्र दिवसेंदिवस खालावत आहे. अशी खंत ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, संशोधनात्मक लेखनासाठी 'कै. कृष्ण मुकुंद (उजळंबकर) स्मृती पुरस्कार डॉ. जाधव यांच्या हस्ते 'आक्षिप्त मराठी साहित्य' या ग्रंथासाठी डॉ. गीतांजली घाटे याना प्


पुस्तकदिनाच्या निमित्ताने साहित्य परिषद करणार चित्रकारांचा सन्मान
पुणे : जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेने यावर्षी मराठी साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणाऱ्या चित्रकारांचा प्रातिनिधिक सन्मान करण्याचे ठरविले आहे. प्रसिद्ध चित्रकार नाना जोशी, ल. म. कडू, चंद्रमोहन कुलकर्णी, अनिल उपळेकर, रविमुकुल, गिरीश सहस्रबुद्धे, चारुहास पंडितया चित्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते हे सन्मान केले जाणार आहेत. हा कार्यक्रम


यूट्यूब चॅनेलद्वारे प्रत्येकाला सेलिब्रिटी बनण्याची संधी - प्रा. क्षितिज पाटूकले यांचे प्रतिपादन
पुणे : 'सोशल मीडियाच्या युगामध्ये आपली सृजनशील निर्मिती जगभरातील लाखो लोकांपर्यंत थेट पोहोचवून प्रत्येकाला सेलिब्रिटी बनण्याची संधी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे,' असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, युट्युबर आणि साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटूकले यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या लेखक, कवी, प्रकाशक यांच्यासाठी युट्यूब चॅनेलची उपयुक्तता या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी,


महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कृष्णमुकुंद पुरस्कार डॉ. गीतांजली घाटे यांना जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी संशोधनात्मक लेखनासाठी कृष्णमुकुंद (उजळंबकर) स्मृती पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या पुरस्कारासाठी डॉ. गीतांजली घाटे यांच्या 'आक्षिप्त मराठी साहित्य' (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे) या ग्रंथास हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपये दहा हजार, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी जयश्री बोकील आणि डॉ. सुजित तांबडे यांच्या ग्रंथनिवड समितीने या ग्रंथाची निवड केली. हा पुरस्कार प्रदान समारंभ शनिवार दिना


पुस्तकनिर्मितीमध्ये अंतरंग आणि बहिरंग यांचा मिलाफ आवश्यक : डॉ. राजेंद्र बनहट्टी
पुणे : "आशय हा पुस्तकाचा खरा आत्मा असतो आणि उत्कृष्ट पुस्तकनिर्मितीसाठी आशयपूर्ण अंतरंग आणि त्याला साजेसे बहिरंग यांचा मनोहर मिलाफ आवश्यक असतो. अशी पुस्तके खऱ्या अर्थाने महत्त्वाची ठरतात." असे मत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र बनहट्टी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या कै. पुष्पा पुसाळकर पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. 'ऐवजी' या नंदा खरे लिखित ग्रंथाच्या उत्कृष्ठ ग्रंथनिर्मितीबद्दल हा पुरस्कार मनोविकास प्रकाशनाचे


लेखक, साहित्यिक, कवी, प्रकाशक यांच्यासाठी यू ट्यूब चॅनेलची उपयुक्तता - प्रा. क्षितिज पाटुकले यांचे व
पुणे : आपली सृजनशील आणि प्रतिभाशाली निर्मिती कौशल्ये यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रकट करण्याच्या नानाविध संधी आता मराठी लेखक, कवी, साहित्यिक आणि प्रकाशक यांना उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या क्षमतांचे डिजिटल क्षमतांमध्ये रूपांतर करून यू-ट्यूब चॅनेलद्वारे त्यांना घरबसल्या सहजपणे लाखो मराठी बांधवांपर्यंत पोहोचता येऊ शकेल. यू-ट्यूब चॅनेल सुरू करण्यासाठी आवश्यक साधने, आवश्यक डिजिटल तंत्रज्ञान, ऑनलाईन डिस्ट्रीब्युशन व्यवस्था आणि यू-ट्यूब चॅनेलद्वारे नानाविध उत्पन्नांचे स्त्रोत कस


मसापचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. 'भारताचे द्रष्टे समाजपुरुष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर डॉ. श्यामा घोणसे यांचे व्याख्यान झाले. यावेळी मसापचे कार्यवाह दीपक करंदीकर आणि बंडा जोशी उपस्थित होते. डॉ. घोणसे म्हणाल्या, 'चारित्र्यसंपन्नता, शीलसंपन्नता, स्वाभिमान, प्रखर स्वदेशाभिमान ही तत्वे त्यांनी स्वतः ही आचरली व समाजाला आचरण करावयास शिकवली. त्य