

लोकमान्यांनी स्वकर्तृत्त्वातून टिळक युग निर्माण केले : डॉ. सदानंद मोरे
महाराष्ट्र साहित्य परिषदेत स्मृतिशताब्दीनिमित्त अभिवादन फोटोओळ : लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी वर्षाच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे टिळक युग या विषयावर डॉ. सदानंद मोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ’केसरी’चे विश्ववस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, यांनी साहित्य परिषदेच्या पदाधिकार्यांना लोकमान्यांचा पुतळा भेट दिला. प्रा. मिंलिद जोशी यांनी तो स्विकारला. पुणे : देशपातळीवरचे पहिले नेतृत्त्व म्हणून देशाने लोकमान्यांना स्विकारले. त्यांनी स्वा


चरित्रकथन आणि अभंग गायनातून साहित्य परिषदेत संत सावतामाळी यांचे पुण्यस्मरण
पुणे : 'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम... पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम' असा गजर करत निघालेली दिंडी, टाळ मृदूंग आणि चिपळ्यांचा नाद याने भारावलेले माधवराव पटवर्धन सभागृह अशा वातावरणात संत सावतामहाराजांचे चरित्रकथन आणि अभंग गायनातून संत सावतामाळी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेत अभिवादन करण्यात आले. निमित्त होते संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीचे संत सावतामाळी यांचे चरित्रकथन व अभंग गायनाचा कार्यक्रम वैष्णवी भजनी मंडळातील शोभा कुलकर्णी, स्मिता पिंपळे,


लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीच्या पूर्वसंध्येला डॉ. सदानंद मोरे यांचे 'टिळक युग या विषयावर व्याख्
पुणे : भारतीय असंतोषाचे जनक आणि महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावलेले परिषदेचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दीला १ ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने पूर्वसंध्येला बुधवार दि. ३१ जुलै २०१९ रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे य


संतवाड्मयामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा समतोल समन्वय : डॉ. अभय टिळक
महाराष्ट्र साहित्य परिषदेत पुरस्कारांचे वितरण पुणे : समर्थ रामदासांनी प्रवृत्तीपर उपदेश केला आणि इतर संतांनी निवृत्तीपर मार्ग दाखवला, असे नसून समर्थांसह सर्वच संतांनी प्रवृत्ती आणि निवृत्तीचा समतोल समन्वय साधावा असे सांगितले आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अभय टिळक यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत ह. भ. प. कै. सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार डॉ. श्रीपाद जोशी (इंदोर) आणि कै. रवींद्र भट पुरस्कार संत


अंदाजपत्रकामध्ये लिंगसमानता दिसत नाही : डॉ. नीलम गोऱ्हे यांची खंत
महाराष्ट्र साहित्य परिषदेत राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमाला पुणे : स्त्रियांच्या दृष्टीने अंदाजपत्रकात अर्थरचना झालेली नाही. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांची गरज ओळखून गुंतवणूक करण्यापेक्षा महिला मेळावे, महिलांना सरसकटपणे कांडप मशीन आणि शिलाई मशिन वाटप यासारखे उपक्रम राबवले जातात. अंदाज पत्रकात लिंगसमानता दिसून येत नाही. अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी खंत व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमालेत 'स्त्री आणि


शाहिरीने दुमदुमली साहित्यपंढरी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ग दि माडगूळकर, वसंत बापट या कवींनी लिहिलेल्या शाहिरी काव्याच्या सादरीकरणाने साहित्य पंढरी दुमदुमली. निमित्त होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'साहित्यिकांची शाहिरी' या विशेष कार्यक्रमाचे शाहीर हेमंतराजे मावळे यांनी त्यांचे सहकारी प्


राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमालेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची व्याख्याने
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या गौरवार्थ दोन व्याख्यानांचे आयोजन केले जाते. यावर्षी या व्याख्यानमालेत लेखिका आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची व्याख्याने होणार आहेत. मंगळवार, २३ जुलै रोजी डॉ. गोऱ्हे यांचे 'स्त्री आणि समाजकारण' या विषयावर व्याख्यान होणार असून बुधवार, २४ जुलै रोजी त्या 'स्त्री आणि राजकारण' या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, चैतन्य बनहट्टी,


महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. रवींद्र भट स्मृती पुरस्कार मा. मोहनबुवा रामदासी यांना जाहीर
पुणे : कै. रवींद्र भट यांच्या स्मरणार्थ दरवर्षी संतसाहित्य क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल एक मानाचा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा कै. रवींद्र भट स्मृती पुरस्कार मा. मोहनबुवा रामदासी यांना प्रदान करण्यात येणार आहे. रु. ७५००/- आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संतसाहित्याचे ख्यातनाम अभ्यासक मा. डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान समारंभ सोमवार दि. २२ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महारा


डॉ. श्रीपाद जोशी (इंदोर) यांना मसापचा सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे तर्फे दरवर्षी डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत कै. प्राचार्य शं. वा. तथा सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार, तत्वज्ञान / नीती / अध्यात्म / मानसशास्त्र विषयक ग्रंथाला दिला जातो. या वर्षीचा हा पुरस्कार 'मानवी स्वभावाचे त्रिगुणात्मक विश्लेषण' या ग्रंथासाठी डॉ. श्रीपाद जोशी (इंदोर) याना दिला जाणार आहे. रुपये ७५००/- आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी ग्रंथांची निवड डॉ. अविनाश अवलगावकर व डॉ. चंद्रशेखर चिंगरे यांच्या निवड समितीन


अभिवाचनातून उलगडले प्रातिभ स्नेहबंध जी. ए. आणि सुनीता देशपांडे यांच्या पत्रांचे अभिवाचन
पुणे : मराठी साहित्यातील कथेचे दालन आपल्या कथा साहित्यातून श्रीमंत करणारे कथाकार जी. ए. कुलकर्णी आणि आपला करारी बाणा जपणाऱ्या संवेदनशील लेखिका सुनीता देशपांडे यांच्यातील प्रातिभ स्नेहबंधाचे दर्शन 'रुंग्ली रुंग्लीयॉट' या या कार्यक्रमातून साहित्य रसिकांना घडले. निमित्त होते जी. ए. कुलकर्णी यांच्या ९६ व्या जयंतीचे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि जी. ए. कुटुंबीय यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात जी. ए. कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे यांच्या पत्रांचे अभिवाचन अभिनेते गिरीश कुलकर्णी