

लोकसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड
डॉ. सरोजिनी बाबर जन्मशताब्दी निमित्त आयोजन पुणे : लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवार दि. १ सप्टेंबर २०१९ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७. ३० या वेळेत लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. लोकरंग
पूरग्रस्त ग्रंथालयांसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद देणार पुस्तकसाथ
साहित्यिक, साहित्यप्रेमी, प्रकाशकांना आणि ग्रंथविक्रेत्यांना पुस्तकरूपाने मदत करण्याचे आवाहन पुणे : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे भीषण पुरस्थितीचा सामना करावा लागला. या महापुरामुळे असंख्य लोकांचे संसार उध्वस्त झाले. हजारो लोक बेघर झाले. या महापुरात अनेक वर्षांची परंपरा असलेली आणि वाचन संस्कृती समृद्ध करणारी छोट्या छोट्या गावातील तसेच शहरातीलही ग्रंथालये जलमय झाली. हजारो पुस्तकांचा अक्षरशः लगदा झाला. ही ग्रंथालये पुन्हा पुस्तकांनी फुलून जाण्यासाठी आणि त


इतर भाषांना राजकीय हेतूने अभिजात दर्जा : डॉ. निशिकांत मिरजकर
'मसाप'चा डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार डॉ. कल्याण काळे यांना प्रदान पुणे : मराठी ही अभिजात भाषा आहेच फक्त तसा अधिकृत दर्जा शासनाने दिलेला नाही, तो लवकर मिळायला हवा. इतर भाषांना राजकीय हेतूने अभिजात दर्जा दिला जातो, असे प्रतिपादन प्रख्यात समीक्षक आणि अभ्यासक डॉ. निशिकांत मिरजकर यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित कै. डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कारप्रदान समारंभात ते बोलत होते. यावर्षीचा पुरस्कार भाषातज्ज्ञ डॉ. कल्याण काळे यांना डॉ. निशिकांत मिरजकर यांच्या हस्ते प्रद
कवितेचे बहरलेले झाड उन्मळून पडले
साहित्य परिषदेत कवी अनिल कांबळे यांना मान्यवरांची श्रद्धांजली पुणे : कविता हाच अनिल कांबळे यांचा ध्यास आणि श्वास होता. त्यांनी कवितेसाठी सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या निधनाने कवितेचे बहरलेले झाड उन्मळून पडले अशा शब्दात साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी कवी अनिल कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यादीप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अनिल कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद ज


डॉ. कल्याण काळे यांना 'मसाप'चा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने, कै. डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, दरवर्षी मराठी वाङ्मयक्षेत्रातील कार्याबद्दल, एक मानाचा पुरस्कार दिला जातो. प्रसिद्ध भाषातज्ज्ञ व समीक्षक डॉ. कल्याण काळे यांना यावर्षीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बुधवार दि. १४ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हो


कवी अनिल कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साहित्य परिषदेत बुधवार दि. ७ ऑगस्ट २०१९ ला सभा
पुणे : प्रसिद्ध कवी आणि गजलकार अनिल कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यदीप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार ७ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ६ : १५ वाजता ही सभा साहित्यपरिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.


राज्यकर्ते कलावंतात सवतासुभा निर्माण करतात : डॉ. प्रकाश खांडगे
महाराष्ट्र साहित्य परिषदेत अण्णाभाऊ साठेंना परिसंवादातून अभिवादन पुणे : अण्णा भाऊ साठे आणि त्यांचे सर्व समकालीन लोक कलावन्त यांच्यात सुसंवाद आणि समन्वय होता. समाजहितासाठी सर्वजण एकत्र यायचे हे चित्र आज दिसत नाही. त्यामुळे या दुहीचा फायदा घेत राज्यकर्ते कलावंतात सवतासुभा निर्माण करतात. अशी टीका लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, संवाद पुणे आणि स्वामी विवेकानंद शिक्षण प