

भेटलेल्या माणसांनीच दिली विचारांची श्रीमंती : डॉ. विश्वास मेहंदळे
परिषदेमध्ये रंगल्या मसाप गप्पा पुणे : काळ बदलला. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती बदलली माझ्या शालेय जीवनातील पुणे आता एक टक्काही राहिले नाहीत. त्यावेळी पुण्यात फिरताना अनेक विचारवंत, ज्ञानवंत भेटायचे त्यांच्यापुढे माथा नम्र व्हायचा. कलेला प्रतिभेला आणि लेखकांना त्याकाळात फार महत्त्व होते. ते दिवस आता राहिले नाही. संगणक युगात माणसं माणसापासून दूर गेली. संस्कार करणारी माणसं भेटत नाहीत. माझ्या उमेदीच्या काळात अशी संस्कार विद्यापीठे मला भेटत गेली. भेटलेली माणसं मी वाचत गेलो


मराठी माणसांच्या हृदयातील अढळ स्थान हेच गदिमांचे चिरंतन स्मारक : प्रा. मिलिंद जोशी
पुणे : गदिमांच्या निधनाला चाळीस वर्षे झाली. गदिमांच्या जन्मशताब्दीची सांगता व्हायची वेळ आली तरी त्यांचे यथोचित स्मारक त्यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यात होऊ शकले नाही. इतकी सरकारे आली गेली पण कोणीही काहीही ठोस केले नाही. गदिमांच्या स्मारकाबाबत राज्यकर्ते असंवेदनशील आहेत. समस्त मराठी जनतेने गदिमांना आपल्या हृदय सिहासनावर जे आदरांचे अढळ स्थान दिले आहे तेच त्यांचे चिरंतन स्मारक आहे. असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र वा


समितीची पुनर्स्थापना लवकरच
लोकसाहित्य जतन करण्याबाबत डॉ. नीलम गोर्हे करणार सरकारला सूचना पुणे : राज्याला लोकसाहित्याची परंपरा आहे. लोकसाहित्याचा ठेवा जतन करण्यासाठी राज्य सरकारला लोकसाहित्य समिती पुनर्स्थापना करण्याची सूचना करणार आहे. असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सांगितले. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकरंग सांस्कृतिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने लोकसाहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण नाट