

ग्रंथपालांमुळेच ग्रंथालये श्रीमंत होतात : डॉ. शकुंतला काळे
साहित्य परिषदेत वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथपालांचा सन्मान पुणे : ग्रंथपाल हे विद्याधनाचे कुबेर आहेत. ग्रंथपाल जितके जाणकार तितके ग्रंथ जाणतेपणाने वाचकांपर्यंत पोचतात. त्यातून वाचन संस्कृतीचे भरण पोषण होते. ग्रंथपालांमुळेच ग्रंथालये श्रीमंत होतात असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने वाचन प्रेरणदिनाच्या निमित्ताने भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर पुणे या स


कोजागिरी पौर्णिमेनिमित नव्या जुन्याच्या काठावर रंगले कविसंमेलन
पुणे: "खूप दारं आहेत या कवितेला ती शोधून काढण्याचा खेळ तुम्हाला खेळायचा आहे. " अशा अनेक आशयगर्भ कविता सादर करीत सम्मेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ कवयित्री डॉ अरुणा ढेरे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. भा. रा. तांबे. गदिमा, बा. भ. बोरकर,कवी बी, वसंत बापट, जगदीश खेबुडकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर ,ग्रेस, शांता शेळके यांच्या कवितेतले मर्म डॉ ढेरे यांनी बोलण्यातून उलगडले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी कवी साहित्यिकांच्या आठवणी जागवत मैफलीत रंग भरला


जन्मापासून आयुष्याशी भांडत आलो : रमजान मुल्ला
मसापमध्ये 'एक कवी एक कवयित्री' कार्यक्रम पुणे : कोणत्या जातीधर्मात जन्माला यायचं आपल्या हातात नसतं. मी तर जन्मापासूनच आयुष्याशी भांडत आलो आहे. असे मत कवी रमजान मुल्ला यांनी व्यक्त केले. मसापच्या 'एक कवी एक कवयित्री' या कार्यक्रमात महापुरात सर्वस्व गमावलेले रमजान मुल्ला आणि लता ऐवळे यांची मुलाखत उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी घेतली. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि सुनिताजें पवार उपस्थित होते. रमजान मुल्ला म्हणाले,


स्त्रियांनी संघर्षात डगमगू नये : संगीता जोशी
पुणे : स्त्री शक्ती म्हणजे शारीरिक शक्ती नव्हे. स्त्री शक्ती म्हणजे आंतरिक शक्ती असते. स्त्रीमध्ये अनेक गुण असतात. त्यांच्या गुणांचा दबाव समाजावर असतो. आता संघर्ष करताना स्त्रियांनी संघर्षात डगमगू नये. असे मत ज्येष्ठ गझलकार संगीता जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवानिमित्त स्त्रीशक्ती, स्त्रीजाणिवा आणि स्त्रीमुक्तीच्या कवितांचा जागर 'कविता दुर्गेच्या' या निमंत्रित कवयित्रींच्या संमेलना