

सम्मेलनाच्या व्यासपीठानी गांधीजीना नेहमीच डावलले : अरुण खोरे
का. र. मित्र. व्याख्यानमालेचा समारोप पुणे : वि. स.खांडेकर, साने गुरुजी, विनोबा, मर्ढेकर, माडखोलकर, वसंत बापट, पुल, गदिमा या सर्व लेखकांच्या साहित्यावर गांधी विचारांचा ठळक प्रभाव आहे. असे असतानाही गांधीजींच्या विचारांचा जागर करण्याची मानसिकता सम्मेलन आयोजकांकडे दिसली नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानेही त्याकडे दुर्लक्ष केले. सम्मेलनाच्या व्यासपीठांनी गांधीजींना नेहमीच डावलले अशी टीका ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित का.


रेव्हरंड टिळकांचे ख्रिस्ती धर्मांतर हे त्याकाळातील कर्मठपणाविरुद्ध बंडच होते : डॉ. वंदना बोकील-कुलकर
पुणे : रेव्हरंड टिळकांचे ख्रिस्ती धर्मांतर हे त्याकाळातील कर्मठपणाविरुद्ध बंडच होते. असे मत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी व्यक्त केले. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या का. र. मित्र व्याख्यानमालेचे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय 'कवी रेव्हरंड टिळक : जीवन आणि काव्य' असा होता. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर उपस्थित होते. रेव्हरंड नारायण वामन ट


कवी कृ. ब. निकुंब यांच्या कवितेची कक्षा व्यापक होती : डॉ. विद्यागौरी टिळक
मसापच्या का. र. मित्र व्याख्यानमालेला प्रारंभ पुणे : कवी कृ. ब. निकुंब यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून कविता करायला सुरुवात केली होती. त्यांचे वाचन आणि निरीक्षण अतिशय सूक्ष्म होते. त्यांच्या कवितेत काळाचे प्रतिबिंब उमटले आहे. समकालीन राजकारणाचे पडसाद त्यांच्या कवितेत आहेत. त्यांच्या काही कविता सामाजिक, राजकीय संदर्भाच्या होत्या. आत्मशोध, हा त्यांच्या कवितेचा मुख्य गाभा होता. भोवतालच्या गोष्टींची जाणीव त्यांच्या कवितेतून दिसून येते. कवी म्हणून कृ. ब. निकुंब यांच्या कवितेची


औंधचे पंतप्रतिनिधी हे साहित्य संस्कृतीचे पाठीराखे : डॉ. अरुणा ढेरे
पुणे : शासन आणि साहित्य, कला संस्कृती यांच्यात सुसंवाद कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ औंधचे पंतप्रतिनिधी यांनी आपल्या राज्यकारभारातून घालून दिला. कलेची सौंदर्यदृष्टी आणि सामर्थ्य यांचा मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांनी संस्थानच्या विकासाबरोबर साहित्य संस्कृतीला पाठबळ दिले. औंधचे पंतप्रतिनिधी हे साहित्य संस्कृतीचे पाठीराखे होते असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत औंध संस्थानचे अधिपती राजा
मसापच्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर, २० डिसेंबरला आनंद अंतरकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
'पुरुष उवाच', 'लोकसत्ता', 'संवाद सेतू', 'चौफेर समाचार', 'छात्र प्रबोधन' आणि 'लिंग' (ऑनलाईन) या दिवाळी अंकांना सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांची पारितोषिके पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' 'पुरुष उवाच' या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक 'लोकसत्ता' या दिवाळी अंकाला


महाराष्ट्र साहित्य परिषद भीमगीतांनी दुमदुमली
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमाने नितीन गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या बुद्ध, भीम, रमाई गीतांनी माधवराव पटवर्धन सभागृह दुमदुमले. साहित्य परिषदेत प्रतिवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमित्त १४ एप्रिल रोजी गेली अनेक वर्ष बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने, चर्चासत्रे, कविसंमेलने परिषदेत आयोजित केली जातात. महामानव डॉ. आंबेडकरा


'मसाप' च्या माधवराव पटवर्धन सभागृहात लागणार बाळासाहेब पंतप्रतिनिधींचे तैलचित्र
१५ डिसेंबरला गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी आणि डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते अनावरण पुणे : महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला टिळक रस्त्यावरील जागा वास्तू उभारणीसाठी उदार मनाने देणारे औंध संस्थानचे अधिपती राजा भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे तैलचित्र महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात लावण्यात येणार आहे. हे तैलचित्र लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण व मसाप शाखा चिपळूण यांच्यावतीने परिषदेला देण्यात


कणा असलेले साहित्यिक कमीच : अजीम नवाज राही
पुणे : 'अनुभव हेच माझे माणिक-मोती आहेत. जगण्याचे उत्खनन करीत आलो आहे. घरात साहित्यिक परंपरा नव्हती. साहित्याची आवड नव्हती पण जिज्ञासा होती. उर्दू आणि मराठी या दोन मातांनी माझी कविता जगवली. या दोन मातांचे दूध पिल्यामुळे मी कवी झालो आहे. लेखकाला विचारांचा कणा हवाच. आज कणा असलेले साहित्यिक कमी झाले आहेत असे मत प्रसिद्ध कवी अजीम नवाज राही यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'एक कवयित्री एक कवी' या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात सुचिता खल्लाळ(नांदेड) आणि अज


'मसाप गप्पा' मध्ये चंदू बोर्डे यांच्याशी गप्पा
पुणे : भारताचे माजी संघनायक, निवड समितीचे अध्यक्ष, भारतीय संघाचे व्यवस्थापक व उत्कृष्ठ मार्गदर्शक चंदू बोर्डे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जुन्या काळातील स्पर्धा व बदलते क्रिकेट यावर ते भाष्य करतील. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह व ज्येष्ठ क्रीडा समालोचक प्रकाश पायगुडे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार दि. ०९ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. महाराष्