

योग ही आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया : डॉ. संप्रसाद विनोद
साहित्य परिषदेत स्वामी स्वरूपानंद स्मृती व्याख्यान पुणे : आपण सारे बाहेरच्या जगात अडकून पडलो आहोत. मन:शक्ती, आरोग्य आणि तणावातून मुक्ती या गोष्टीच केवळ योगामुळे साध्य होतात असे नाही तर योगामुळे आंतरिक परिवर्तन घडते. योग ही आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे, असे मत प्रसिद्ध योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत स्वामी स्वरूपानंद स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते. ‘योगविद्येचे अंतरंग’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी महाराष्ट्र सा


... आणि उलगडले जगसफरीचे रोमांचकारी अनुभव
परिषदेत रंगल्या 'मसाप गप्पा' पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना लंडन दाखविण्याचा आलेला योग... त्या बदल्यात त्यांनी सांगतिलेले शिवचरित्र .... तुम्ही जे सूक्ष्म तपशिलासह सांगत आहात ते लिहून काढा असा त्यांचा आग्रह... त्यातून लेखनास केलेला प्रारंभ... मौजच्या राम पटवर्धनांनी पहिल्याच पुस्तकासाठी अकरा वेळा करून घेतलेले पुर्नलेखन... त्यानंतर प्रकाशित झालेले पुस्तक... त्याला वाचकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद... अन डॉक्टरकी करताना प्रवासवर्णनाच्या लेखनाची सापडलेली लय... त्यातून आले


'मसाप गप्पा' कार्यक्रमात मीना प्रभू यांच्याशी गप्पा
पुणे : 'प्रवासवर्णन' या साहित्य प्रकारात लक्षणीय योगदान देऊन मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका मीना प्रभू महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार दि. २७ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्