

मसापमध्ये गीतांतून सावरकरांना अभिवादन
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकरांच्या जीवनावर आधारित 'अग्निपूजा' या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार कै. अरविंद लेले यांनी परिषदेला दिलेल्या देणगीतून स्मृतिदिनाचा कार्यक्रम करण्यात येतो. लेखन आणि निवेदन विश्वास गांगुर्डे यांचे होते, गायन श्रीपाद भावे, आनंद भीमसेन जोशी, ईश्वरी महाबळेश्वरकर, भगवान धेंडे, रमेश वैद्य यांनी केले. तबल्यावर साथ घनश्याम कुलकर्णी यांनी बासरीची साथ रमेश मुलाणी, यांन


लेखकाने भयमुक्त होऊन लेखननिर्मिती करावी : भारत सासणे
मराठी भाषा दिनानिमित्त मसापच्या विविध पुरस्कारांचे वितरण पुणे : आता सर्वाधिक द्वेषाचा काळ आलेला आहे. विवेकशून्यतेच्या दिशेने समाजाचा प्रवासदेखील सुरु आहे. एका विनाशाकडे, विद्वेषाकडे, गृहयुद्धाच्या कालखंडाकडे आपण वाटचाल करतो आहोत. कोलाहलामध्ये नेहमीच क्षीण असलेला विवेकाचा आवाज लेखकाने ऐकला पाहिजे व त्याअनुषंगाने भयमुक्त होऊन लेखननिर्मिती केली पाहिजे. यामध्येच समाजहित दडलेले आहे. असे मत भारत सासणे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी मराठी भाषा दिनानिमित्त


साहित्य परिषदेत चिमुकल्यांचा चिवचिवाट
मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हस्ताक्षर-अभिवाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे, दि. २६ (प्रतिनिधी) : एरवी वैचारिक विषयांवरील व्याख्याने, परिसंवाद, कविसंमेलन अशा कार्यक्रमांनी गजबजणाऱ्या परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आज मात्र चिमुकल्यांचा चिवचिवाट होता. निमित्त होते, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि ‘शब्दसारथी’ यांच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर-अभिवाचन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे! पुणे शहर व परिसरातील विविध शाळांतील ४०० हू


वैचारिक प्रगतीसाठी समृद्ध पत्रकारितेची आवश्यकता : डॉ. श्रीपाल सबनीस
साहित्य परिषदेत जांभेकर स्मृती व्याख्यान पुणे : महाराष्ट्रामध्ये उपेक्षा करुन मारणं ही लोकांची एक फार आवडती कला आहे. हीच उपेक्षा बाळशास्त्री जांभेकरांच्याही नशिबी आली. जांभेकरांचं कर्तृत्त्व महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यातल्या मातीच्या शेवटच्या कणापर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहचवणं आवश्यक आहे. बाळशास्त्रींच्या विचारांची सूत्रं महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचली तर आधुनिक काळातली रसिकता, वाचनसंस्कृती ही सत्याच्या बाजूने झुकेल. लेखण्या विकलेल्या देशाला कुठलंही भविष्य नसतं


२७ फेब्रुवारीला साहित्य परिषदेतर्फे वाङमय पुरस्काराचे वितरण
पुणे - महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारीला विशेष वाड्मय पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षीच्या कॉन्टिनेन्टल पुरस्कृत चिं. वि. जोशी पुरस्कारासाठी डॉ. सुमन नवलकर (मुंबई) यांच्या 'मस्त झकास अफाट इ. इ.' या विनोदी कथासंग्रहाची, कै. द. वा. पोतदार पुरस्कारासाठी विनायक व विशाखा अभ्यंकर यांच्या 'झेप रणभूमीवर' या ऐतिहासिक ग्रंथाची, कै. शं. ना. जोशी पुरस्कारासाठी डॉ. राधिका टिपरे यांच्या 'अजिंठा' या ग्रंथाची, कै. विद्याधर पुंडलिक पुरस्कारासाठ


आजही स्त्रीला द्यावी लागते चारित्र्याची परीक्षा : डॉ. अरुणा ढेरे
मसापमध्ये 'सीतेची गोष्ट' या दीर्घकथेचे अभिवाचन पुणे : सीतेची कथा म्हणजे रामायणाचा शेवटचा भाग. आपण आपल्या काळाच्या बिंदूवर राहून सीतेला आपल्या जगण्याच्या काळाशी जोडून घेऊ शकतो. तो अनुभव सीतेला बघून येतो. सीतेवर ज्याप्रमाणे आरोप करण्यात आले, त्याप्रमाणे आजच्या काळातही स्त्रीवर आरोप होतात. आजही जगभर स्त्रीला आपल्या चारित्र्याची परीक्षा द्यावी लागते. तिच्यावर होणारे आरोप तिला स्वतःला खोडावे लागतात. स्त्रियांबद्दल आजही अत्यंत चुकीच्या कल्पना आहेत. आजही चारित्र्याची परीक्षा स्त्रील


महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार विनय पाटील यांना जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या कै. सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कारासाठी विनय पाटील (मुंबई) यांच्या 'आदितृष्णा' या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कवयित्री आश्लेषा महाजन आणि अंजली कुलकर्णी यांच्या निवड समितीने या ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे निमंत्रक म्हणून बंडा जोशी यांनी काम पाहिले. गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी मराठी भाषा दिनी सायंकाळी ६ वाजता महारा

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ८ लेखन कार्यशाळांचे आयोजन
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मार्च ते मे २०२० अखेर ८ लेखन कार्यशाळां आयोजित केल्या आहेत. यशस्वी व्यावसायिक लेखक कसे बनावे ? - कॉपीराईट, आय.एस.बी.एन. हार्ड बुक/किंडल ई-बुक/ऑडियो बुक प्रकाशन व ऑनलाईन पुस्तक वितरण ( ०८ मार्च ), कथालेखन कसे करावे ? ( २२ मार्च ), कादंबरीलेखन कसे करावे ? ( ०५ एप्रिल ), ब्लॉगलेखन कसे करावे ? ( १९ एप्रिल ), कविता आणि गझललेखन कसे करावे ? ( २६ एप्रिल ), साहित्य रसग्रहण ( १०


महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी यशवंत पुरस्कार नीतीन मोरे यांना जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी, उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी कवी यशवंत पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी नीतीन मोरे यांच्या 'गात्र गात्र रात्र' या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी काव्यसंग्रहाची निवड धनंजय तडवळकर आणि चंचल काळे यांच्या निवड समितीने केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे निमंत्रक म्हणून बंडा जोशी यांनी काम पाहिले. गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी मराठी भाषा दिन


महाराष्ट्र परिषदेचा रा. श्री. जोग पुरस्कार डॉ. शुभांगी पातुरकर यांना जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी, उत्कृष्ट समीक्षा ग्रंथासाठी रा. श्री. जोग पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी डॉ. शुभांगी पातुरकर यांच्या 'छंदोमीमांसा' या समीक्षा ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी ग्रंथाची निवड डॉ. सुजाता शेणई आणि डॉ. कीर्ती मुळीक यांच्या निवड समितीने केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे निमंत्रक म्हणून बंडा जोशी यांनी काम पाहिले. गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी