

पूर्णवेळ लेखक ही उत्तम करिअर संधी - प्रा. मिलिंद जोशी
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्य सेतू यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या लेखन कार्यशाळां मालिकेच्या उदघाटन प्रसंगी मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पूर्णवेळ लेखक ही उत्तम करिअर संधी आहे असे प्रतिपादन केले.
"यशस्वी व्यावसायिक लेखक बना" ही पहिली रविवार ८ मार्च रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, चिपळूण तसेच मुंबई विभागातून मोठ्या प्रमाणावर नवोदित लेखकांनी सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेमध्


संत मीराबाई करुणेचा सागर : डॉ. राधा मंगेशकर
पुणे : करुणा म्हणजे दया नव्हे. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या सुखदःदुखाशी समरस होणे. संत मीराबाईना समजून घेण्यासाठी ती करुणा आपल्या ठायी असणे गरजेचे आहे. संत मीराबाई या करुणेचा सागर आहेत. असे मत प्रसिद्ध गायिका डॉ. राधा मंगेशकर यांनी व्यक्त केले. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र साहित्य परिषदेत आयोजित कार्यक्रमात 'मीरा समजून घेताना' या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध


मनातून सगळेच जातीयवादी आहेत - म. भा. चव्हाण
पुणे : कवितेला धर्म नसतो. कवितेला जात नसते. कविता फक्त संवेदना असते. गझलकार सुरेश भट कुणाचे गुरु नाहीत. त्यांचा कोणीही शिष्य नाही. सुरेश भट कलंदर प्रतिभावंत होते. मानवतेचे कैवारी होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना करणे चुकीचे आहे. दोन्ही महामानव श्रेष्ठ होते. एक स्वातंत्र्यासाठी लढले दुसरे जातिअंतासाठी. गांधी आणि आंबेडकरांची निर्भयता लाख मोलाची आहे. कविता आणि गझल यात भेद करू नये. गझल हा कवितेचाच एक प्रकार आहे. कवितेला सत्याचे अधिष्ठान असले पाहिजे. सध्या


विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अशोक नायगावकर
२७ आणि २८ मार्चला फलटणला होणार संमेलन पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन २७ आणि २८ मार्च रोजी फलटण जि. सातारा येथे होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेने या संमेलनाचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्षपदी सदगुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांची तर कार्याध्यक्षपदी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके) यांची निवड करण