

मसाप आणि विश्वकोश निर्मिती मंडळात सामंजस्य करार- मसापला ज्ञानमंडळ म्हणून मान्यता
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने आपल्या कामासाठी विविध विद्यापीठे व शैक्षणिक, संशोधन संस्था यांच्या सहयोगातून विविध विषयावरील ज्ञानमंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेची साहित्य या विषयावरील ज्ञानमंडळ म्हणून निवड केली. त्या संदर्भातला सामंजस्य करार झाला. या करारावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सचिव सुवर्णा पवार यांनी स्वाक्षर्या