top of page

प्रकाशने 

 दुर्मीळ इ-ग्रंथ पेढी

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांचा खजिना आता तुमच्या मोबाईलवर. मसाप ने पहिल्या टप्प्यामध्ये १६३ दुर्मीळ ग्रंथ इ-बुक स्वरुपात त्यांचे डिजिटायझेशन करुन संकेतस्थळावर सर्वांसांठी मोफत उपलब्ध केले आहेत. जगभरातील साहित्य प्रेमीं, संशोधक आणि अभ्यासक याचा लाभ घेऊ शकतात.

Dr. Aruna Dhere.JPG
Anand Yadav

९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, यवतमाळ 

डॉ. अरुणा ढेरे यांचे अध्यक्षीय भाषण

नव्वदावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, डोंबिवली

अध्यक्षीय भाषण

संमेलनाध्यक्ष:  डॉ. अक्षयकुमार काळे

८२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, महाबळेश्वर

डॉ. आनंद यादव यांचे प्रस्तावित अध्यक्षीय भाषण

सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका मोफत डाउनलोड करा.

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड पहिला (किंमत रु. ५००/-)

          महाराष्ट्र साहित्य परिषदेने आखलेल्या ‘मराठी वाड़्मयाचा इतिहास ’ या योजनेतील हा पहिला खंड आहे. त्यात मराठी भाषेच्या जन्मकाळापासून इ. स. १३५०, म्हणजे संत नामदेव अखेरपर्यंत निर्माण झालेल्या वाड़्मयाचा सविस्तर परामर्श घेतला आहे. या प्रथम खंडाचे संपादन डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी केले आहे.

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड दुसरा : भाग पहिला

(किंमत रु. ७००/-)

          मराठी वाड़्मयातील प्रवृत्तिप्रवाहांचा परामर्श घेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने जी व्यापक योजना आखली, तिच्यापैकी इ. स. १३५० ते १६८० या कालखंडातील साहित्याचे समालोचन करणाऱ्या दुसऱ्या खंडाचा हा पहिला भाग. याचे संपादन डॉ. स. गं. मालशे यांनी केले आहे.   

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड दुसरा : भाग दुसरा (किंमत रु. ७००/-)

          मराठी वाड़्मयातील प्रवृत्तिप्रवाहांचा परामर्श घेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने जी व्यापक योजना आखली, तिच्यापैकी इ. स. १३५० ते १६८० या कालखंडातील साहित्याचे समालोचन करणाऱ्या दुसऱ्या खंडाचा हा दुसरा भाग. याचे संपादन डॉ. स. गं. मालशे यांनी केले आहे.            

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड तिसरा (किंमत रु. ३५०/-)

          मराठी वाड़्मयातील प्रवृत्तिप्रवाहांचा परामर्श घेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने जी व्यापक योजना आखली, तिच्यापैकी इ. स. १६८० ते १८०० या कालखंडातील साहित्याचे समालोचन करणारा हा खंड.

लेखक: रामचंद्र जोग, केशव वाटवे, गंगाधर ग्रामोपाध्ये, नारायण जोशी, गोविंद कुलकर्णी, विनायक करंदीकर, भगवंत देशमुख, प्रल्हाद जोशी, अनंत कुलकर्णी, गंगाधर मोरजे, मधुकर केंदुरकर     

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड चौथा (किंमत रु. ४००/-)    

       मराठी वाड़्मयातील प्रवृत्तिप्रवाहांचा परामर्श घेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने जी व्यापक योजना आखली, तिच्यापैकी इ. स. १८०० ते १८७४ या कालखंडातील साहित्याचे समालोचन करणारा हा खंड.

लेखक: रामचंद्र जोग, भवानीशंकर पंडित, गोविंद कुलकर्णी, विश्वनाथ पटवर्धन, कृष्णा कुलकर्णी, विनायक करंदीकर, लक्ष्मण भिंगारे, द कुलकर्णी, चंद्रशेखर बर्वे, नागनाथ कोतापल्ले

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड पाचवा: भाग पहिला (किंमत रु. ३५०/-)  

        मराठी वाड़्मयातील प्रवृत्तिप्रवाहांचा परामर्श घेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने जी व्यापक योजना आखली, तिच्यापैकी इ. स. १८७५ ते १९२० या कालखंडातील साहित्याचे समालोचन करणाऱ्या पाचव्या खंडाचा हा पहिला भाग.

लेखक: रामचंद्र जोग, विष्णू आंबेकर, वामन कुलकर्णी, महादेव अदवंत, कृष्ण निकुंब, उषा हस्तक

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड पाचवा: भाग दुसरा  (किंमत रु. ३५०/-)

        मराठी वाड़्मयातील प्रवृत्तिप्रवाहांचा परामर्श घेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने जी व्यापक योजना आखली, तिच्यापैकी इ. स. १८७५ ते १९२० या कालखंडातील साहित्याचे समालोचन करणाऱ्या पाचव्या खंडाचा हा दुसरा भाग.

लेखक: रामचंद्र जोग, विष्णू आंबेकर, वामन कुलकर्णी, महादेव अदवंत, कृष्ण निकुंब, उषा हस्तक

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड सहावा: भाग पहिला  (किंमत रु. ३५०/-)

          मराठी वाड़्मयातील प्रवृत्तिप्रवाहांचा परामर्श घेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने जी व्यापक योजना आखली, तिच्यापैकी इ. स. १९२० ते १९५० या कालखंडातील मराठी वाड़्मयाचा विवेचक इतिहास या सहाव्या खंडात दिला आहे. त्याचा हा पहिला भाग.

           १९२०-१९५० ही या खंडाची कालिक व्याप्ती. या कालखंडाचा अवकाश जरी लहान वाटला तरी या कालखंडाचे अंतरंग अनेक प्रकारच्या घटना प्रसंगांनी गजबजलेले आहे. या कालखंडातच दोन महाकाय युद्धे घडून आली. यातूनच जागतिक स्वरुपाचे विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वाड़्मयीन प्रश्न नव्याने उपस्थित झाले. गांधीवाद मार्क्सवाद, आंतरराष्ट्रीयवाद, नवमतवाद यासारख्या नवनवीन जीवनप्रणाली प्रसृत झाल्या त्या या कालखंडातच. या सर्वांचा यथोचित मागोवा व परामर्श या खंडात घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड सहावा: भाग दुसरा (किंमत रु. ३००/-)

        मराठी वाड़्मयातील प्रवृत्तिप्रवाहांचा परामर्श घेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने जी व्यापक योजना आखली, तिच्यापैकी इ. स. १९२० ते १९५० या कालखंडातील मराठी वाड़्मयाचा विवेचक इतिहास या सहाव्या खंडात दिला आहे. त्याचा हा दुसरा भाग.

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड सातवा: भाग पहिला (किंमत रु. ७००/-)

      मराठी वाड़्मयाचा इतिहास विसाव्या शतकाअखेरच्या टप्प्यावर आणून पोहोचवणारा मराठी वाड़्मयाचा इतिहास – १९५०-२००० सातव्या खंडाचा हा पहिला भाग.

       या वाड़्मयेतिहासातील विषय: सांस्कृतिक पार्श्वभूमी, बालवाड़्मय, प्रवासवर्णन, चरित्रवाड़्मय, स्त्रीवादी वाड़्मय, लोकवाड़्मय, विज्ञानवाड़्मय, आदिवासी वाड़्मय, जैन वाड़्मय, ख्रिस्ती वाड़्मय, मुस्लिम वाड़्मय, जनसाहित्य, संगीतविषयक वाड़्मय, कोशवाड़्मय व सूचिवाड़्मय

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड सातवा: भाग दुसरा (किंमत रु. ८००/-)

       मराठी वाड़्मयाचा इतिहास विसाव्या शतकाअखेरच्या टप्प्यावर आणून पोहोचवणारा मराठी वाड़्मयाचा इतिहास – १९५०-२००० सातव्या खंडाचा हा दुसरा भाग.

       या वाड़्मयेतिहासातील विषय: काव्य, नाटक आणि एकांकिका, ग्रामीणवाड़्मय, भाषाविज्ञान, व्याकरण, वाड़्मयीन नियतकालिके, चित्रकला-शिल्पकलाविषयक वाड़्मय, मराठी साहित्य आणि चित्रपट

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड सातवा: भाग तिसरा (किंमत रु. ७००/-)

       मराठी वाड़्मयाचा इतिहास विसाव्या शतकाअखेरच्या टप्प्यावर आणून पोहोचवणारा मराठी वाड़्मयाचा इतिहास – १९५०-२००० सातव्या खंडाचा हा तिसरा भाग.

या वाड़्मयेतिहासातील विषय: कादंबरी, कथा, ललित गद्य, विनोदी वाड़्मय, लोकप्रिय साहित्य, संस्कृत साहित्यशास्त्रीय वाड़्मय, सौंदर्यशास्त्रीय वाड़्मय, इतिहास- वाड़्मय, संपादित वाड़्मय

मराठी वाड़्मयाचा इतिहास – खंड सातवा: भाग चौथा (किंमत रु. ७००/-)

       मराठी वाड़्मयाचा इतिहास विसाव्या शतकाअखेरच्या टप्प्यावर आणून पोहोचवणारा मराठी वाड़्मयाचा इतिहास – १९५०-२००० सातव्या खंडाचा हा चौथा भाग.

या वाड़्मयेतिहासातील विषय: कादंबरी, कथा, ललित गद्य, विनोदी वाड़्मय, लोकप्रिय साहित्य, संस्कृत साहित्यशास्त्रीय वाड़्मय, सौंदर्यशास्त्रीय वाड़्मय, इतिहास- वाड़्मय, संपादित वाड़्मय

भाषा व साहित्य: संशोधन – खंड पहिला (किंमत रु. ५००/-)

संपादक: डॉ. वसंत जोशी

संशोधनविषयक दृष्टी देणाऱ्या, इतकेच नव्हे तर संशोधनविषयक अभिरुची निर्माण करणाऱ्या या खंडाचा वाचक आणि अभ्यासक यांना अधिकाधिक लाभ होईल.

भाषा व साहित्य: संशोधन – खंड दुसरा (किंमत रु. ३००/-)

संपादक: डॉ. वसंत जोशी

संशोधनविषयक दृष्टी देणाऱ्या, इतकेच नव्हे तर संशोधनविषयक अभिरुची निर्माण करणाऱ्या या खंडाचा वाचक आणि अभ्यासक यांना अधिकाधिक लाभ होईल. 

भाषा व साहित्य: संशोधन – खंड तिसरा (किंमत रु. २००/-)

संपादक: डॉ. वसंत जोशी

संशोधनविषयक दृष्टी देणाऱ्या, इतकेच नव्हे तर संशोधनविषयक अभिरुची निर्माण करणाऱ्या या खंडाचा वाचक आणि अभ्यासक यांना अधिकाधिक लाभ होईल. 

A History of Modern Marathi Literature- Volume 1

This History of Modern Marathi Literature in English, a unique project undertaken by the Maharathtra Sahitya Parishad mainly for the non-Marathi scholars and readers, is the result of frequency felt need. The project, to be completed in multiple volumes, is initiated with this first volume focusing on Modern Era. It includes chapters on socio-cultural background of the period and major literary forms of poetry, drama, novel and short story, covering a span of about two hundred years between 1800 and 1990.

A History of Modern Marathi Literature- Volume 2

This is second Volume of History of Modern Marathi Literature. This volume contains an exhaustive and perceptive account of the literary genres such as criticism, essay, biography, autobiography, prose of thought and the like. Complete documentation, unbiased critical approach, and comprehensive treatment make this work invaluable especially for the use of non-Marathi readers.

भारतीय भाषांतील स्त्रीवादी साहित्य (किंमत रु. ८००/-)

          स्त्रीचे माणूसपण नाकरुन तिला जी पशुतुल्य अवस्था प्राप्त झाली त्याविरोधात वैचारिक लढा देत व्यक्ती म्हणून तिचे स्थान निश्चित करणारी स्त्रीवाद ही एक विचारप्रणाली आहे. भारतीय भाषांतील स्त्रीवादी साहित्य या ग्रंथातून अभ्यासकांनी घेतलेला हा स्त्रीवादी साहित्याचा चिकित्सक आढावा वाचकांना स्त्रीप्रश्नाचे, पर्यायाने समाज वास्तवाचे प्रखर दर्शन घडवील.        

महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची (किंमत रु. ४००/-)

(इ.स. १९१३-१९२५: ‘विविध ज्ञान विस्तार’ चे पुरवणी अंक)

(इ.स. १९२८-२००४: महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे स्वतंत्र अंक)

सूचीकार: डॉ. मीरा घांडगे

वरील पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क : संदीप खाडे (७३८५०२९८२५) या फोन वर कळवा. 

प्रत्येक पुस्तकासाठी पोस्टेज/कुरिअर चार्ज भरावे लागतील. महाराष्ट्रासाठी रु. १००/- महाराष्ट्राबाहेर रु. २००/-.

bottom of page