top of page

सदस्यत्व 

सभासदांच्या माहितीसाठी महत्त्वाचे घटनानियम

घ . नि , ४ उद्देश:

मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व विकासासाठी प्रयत्न करणे , मराठी भाषा व साहित्य यांच्या अभ्यासास उत्तेजन देणे , मराठी वाचकांची वाङ्‌मयीन अभिरुची वृद्धिंगत करणे आणि मराठी साहित्यिकांच्या हितासाठी व कल्याणासाठी झटणे हे परिषदेचे उद्देश आहेत.

घ . नि , ८ (अ):

परिषदेचे उद्देश ,घटना व नियम मान्य असलेल्या १८ वर्षांवरील कोणाही व्यक्तीला संस्थेचे सभासद होता येईल.

घ . नि , ८ (इ):

सभासदत्वाच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून परिषदेच्या कोण्त्याही २ (दोन) आजीव सभासदांच्या सह्या असणे आवश्यक आहे.

घ . नि , ८ (ए):

अर्ज मिळाल्यापासून एक महिन्यात सभासदत्वाबद्दल अर्जाचा निर्णय अर्जदारास कळविण्यात येईल.

घ . नि , ९ हक्क:

सर्व सभासदांना परिषदेचे 'म . सा . पत्रिका' हे त्रैमासिक विनामूल्य पाठविण्यात येईल . पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा किंवा उमेदवार म्हणून उभे राहण्याचा हक्क राहील , अ . भा . म . सा .  महामंडळाच्या संमेलनाचे प्रतिनिधी होता येईल. ग्रंथालयाचा वा परिषदेच्या अतिथीगृहाचा नियमांनुसार लाभ घेता येईल .

सभासद वर्ग 

देणगीदारांसाठी आवाहन 

१. उदारहस्ते देणगी देवू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मसापला रक़्कम आणि वस्तू स्वरुपात देणगी देता येईल. देणगी रकमेला Income Tax च्या 80G कलमानुसार Income Tax (आयकर) मध्ये सूट मिळेल.

२. देणगीदारांच्या इच्छेनुसार किंवा संस्थेच्या आवश्यकतेनुसार आपापसांत चर्चा करुन देणगीचा विनियोग कसा करायचा ते करारपत्र करुन ठरवले जाते.

३. देणग्या पुण्यातील मुख्य केंद्राला किंवा महाराष्ट्रातील मसापच्या सुमारे ७० शाखांपैकी कोणत्याही शाखेमध्ये देता येईल.

४. ज्या देणगीदारांनी पूर्वीच परिषदेकडे देणग्या ठेव स्वरुपात दिल्या असतील, कालमानानुसार त्या देणगी रकमेत त्यांना किंवा संबंधीतांना वाढ करायची असल्यास संस्थेत संपर्क साधावा. 

​५. मसापच्या विविध उपक्रमांना / स्पर्धांना / कार्यक्रमांसाठी प्रायोजकत्व स्विकारले जाईल.  

bottom of page