मसाप ब्लॉग  

साहित्य परिषद आता होणार ई – अॅक्टीव्ह

June 27, 2016

 पुणे : साहित्यातील मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने आता बदलत्या काळाची गरज ओळखून ई-साधनांचा अधिकाधिक वापर करून कार्यरत राहण्याचे ठरविले आहे. तरूणाईला आणि आजच्या आधुनिक पिढीला मसापशी जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम नव्या कार्यकारी मंडळाने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून साहित्य परिषदेचे www.masapapune.org हे संकेतस्थळ पुनर्निर्मिती करून अद्ययावत करण्यात आले आहे. या संकेत स्थळाद्वारे साहित्यप्रेमी ई - साधनांद्वारे द्वारे साहित्य परिषदेशी संपर्क साधू शकणार आहेत.  सर्व लेखकांना साहित्य परिषदेच्या या संकेतस्थळावर आपली माहिती नि:शुल्क नोंदविता येणार आहे. मसापने वाचकांना आणि साहित्य रसिकांना परिषदेशी जोडण्यासाठी त्यांच्याही नि:शुल्क नोंदणीची सुविधा उपलब्ध  करुन दिली आहे. साहित्य परिषदेने www.facebook.com/masapapune हे फेसबुक पेज आणि www.twitter.com/masapapune  हे ट्विटर खाते तयार केले असून त्याद्वारे परिषदेच्या विविध कार्यक्रमांची माहिती कार्यक्रमापूर्वी आणि नंतर रसिकांना दिली जाणार आहे. याचबरोबर मसापचा Whatsapp ग्रुप तयार करण्यात आला असून त्यासाठी ८४४६८०६८०६ या क्रमांकावर Masapa Group असा संदेश लिहून पाठवावा.

 

 मसापच्या फेसबुक पेजला आणि Whatsapp ग्रुपला अधिकाधिक साहित्यिकांनी आणि साहित्यप्रेमींनी जोडून घ्यावे असे आवाहन मसा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.    

 

मसापरिषदेचा ब्लॉग आणि यू-ट्युब चॅनेल सुरु करण्यात आले असून त्यासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी. मसापच्या संकेतस्थळावर लवकरच दोन हजारहून अधिक मराठी सारस्वतांचे पत्ते, दूरध्वनी आणि ई - मेल पत्ते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संकेतस्थळाची पुनर्निर्मिती करून ते अद्ययावत करण्याचे काम मसापपरिषदेचे समाजमाध्यम सल्लागार प्रा. क्षितीज पाटुकले यांनी साहित्य सेतूच्या सहकार्याने केले आहे.  

 

 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive