मसाप ब्लॉग  

मराठी वाङमयाचा इतिहास आता ई-बुक आणि मोबाईल ई-बुक रूपात

June 28, 2016

 

तंत्रस्नेही वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी 'मसाप' चा पुढाकार

महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङमयाचा इतिहास सात खंडात प्रकाशित केला आहे. १९८४ साली या प्रकल्पाची सुरुवात झाली. असा प्रकल्प राबविणारी मसाप ही महाराष्ट्रातील एकमेव साहित्य संस्था आहे. शं. गो. तुळपुळे, स. गं.  मालशे, रा. श्री. जोग, गो. म. कुलकर्णी, व. दि. कुलकर्णी, प्रा. रा. ग. जाधव यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडाचे संपादन केले आहे. हे वाङमय इतिहासाचे सर्व खंड आता तंत्रस्नेही वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी ई-बुक आणि मोबाईल ई-बुक रूपात उपलब्द्ध होणार आहेत. याच बरोबर भाषा व साहित्य : संशोधन (खंड १,२ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी म. ना. अदवंत), हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची (सूचीकार : मीरा घाडगे), सुलभ मराठी शुद्धलेखन पुस्तिका अशी मसापची १९ प्रकाशनेही ई - बुक आणि मोबाईल ई - बुक रुपात उपलब्ध होणार आहेत. बुकगंगा डॉटकॉमने ई-बुकच्या आणि डेलिहंटने मोबाईल ई - बुकच्या प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

 

या प्रकल्पाची सुरुवात म्हणून मराठी वाङमयाच्या इतिहासाच्या सातव्या खंडाच्या ई-बुक आणि मोबाईल ई-बुकचे प्रकाशन परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, डेलिहंटच्या अंजली देशमुख, बुकगंगाचे मंदार जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. वाङमय इतिहासाच्या सातव्या खंडाचे (भाग १ ते ४) संपादन प्रा. रा. ग. जाधव यांनी केले. त्यामुळे या खंडाचे ई-बुक आणि मोबईल ई - बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण करीत असल्याचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts