श्रद्धांजली सभा: ज्येष्ठ संशोधक आणि साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांना मसापतर्फे श्रद्धांजली
ज्येष्ठ संशोधक आणि साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांना मसापतर्फे श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवार ५ जुलै २०१६ सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. ढेरेंच्या कन्या डॉ. वर्षा गजेंद्रगडकर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि रसिक उपस्थित होते.