डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत तथा मामा दांडेकर पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने तत्त्वज्ञान, अध्यात्मशास्त्र, मानसशास्त्र, योग किंवा नीती या विषयांशी संबंधित उत्कृष्ट ग्रंथास 'डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत तथा मामा दांडेकर पुरस्कार' प्रतिवर्षी दिला जातो. यावर्षी शकुंतला आठवले यांच्या 'भारतीय तत्त्वविचार' (काँटिनेंटल प्रकाशन) या ग्रंथास हा पुरस्कार मसापचे कार्यकारी विश्वस्त मा. उल्हासदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी म. सा. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. या पुरस्कारासाठी ग्रंथनिवडीचे काम मा. गौरी भागवत व प्रा. विजय कारेकर यांनी केले.