"अभंग रचनांच्या गायनामुळे साहित्य परिषदेचे वातावरण भक्तिमय "
आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा यांचे औचित्य साधुन कै. श्रीराम साठे यांनी स्थापन केलेल्या श्रद्धा भक्ती मंडळाचा एका जनार्दनी हा वारकरी संप्रदायानुसार भजनी परंपरेचा भक्तिगीतांच्या सादरीकरणाने महाराष्ट्र साहित्य परिषेदेचे वातावरण संगीतमय झाले. साहील पुंडलिक, रवींद्र काशीकर, अनुजा पंडीत, राजन चक्के, पटवर्धन व सहकलाकार यांनी या कार्यक्रमात सर्व संतांच्या अनेक भक्तिरचना सादर केल्या.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंदीकर, प्रमोद आडकर, बंडा जोशी, उद्धव कानडे, डॉ. अरविंद संगमनेरकर उपस्थित होते.
