साहित्य परिषदेत रंगली मैफल नवी: एक कवयित्री एक कवी

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने एक कवयित्री एक कवी हा नवीन कार्यक्रम सुरू झाला आहे. प्रारंभीच्या या आगळ्या वेगळ्या मैफिलीचा मान प्रसिद्ध कवी वसंत आबाजी डहाके आणि प्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर यांना देण्यात आला. ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलीमा गुंडी यांनी कवी आणि कवयित्रीशी संवाद साधला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडला. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले व आभार प्रमोद आडकर यांनी मानले.
