संत सावता माळी यांचे चरित्र कथन करत परंपरेला अनुसरून त्यांची विविध भजने समूह स्वरूपात सादर केली गेली
'कांदा, मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, विठ्ठलाचे रूप, आम्ही माळियाची जात, सावत्याने केला मळा, प्रपंची असोशी, त्याच बरोबर जय जय विठोबा माईचा गजर असे सावता माळी यांचे अभंग भजनी ढंगात सादर केले गेले. अवघे सभागृह भक्तीरसात न्हाऊन निघाले. विशेष बाब म्हणजे वैष्णवी भक्ती मंडळाच्या संस्थापिका, संचालिका आणि साहित्य परिषदेच्या आपटे ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ. शोभा कुलकर्णी आणि त्यांच्या सहकारी मीनाक्षी केळकर, स्मिता पिंवळे, मदुरा खिरे, आशा संत, कल्याणी सराफ, छाया करमरकर, सुनीता मोदक यांचा अभंग गायनात सहभाग होता. प्रसाद भावे (तबला), माधव खिरे (हार्मोनिअम) यांची साथसंगत होती.
निमित्त होते संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीचे. या कार्यक्रमास परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह दीपक करंदीकर, प्रमोद आडकर, वी. दा. पिंगळे उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी भरघोस दाद दिली.
