मसाप तर्फे ९ ऑगस्ट २०१६ रोजी मराठीच्या प्राध्यापकांचा स्नेहमेळावा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मराठी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्नेहमेळावा मंगळवार दि. ९ ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी ४ ते ५.३० या वेळेत मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. ज्येष्ठ कवयित्री आणि मसापच्या संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. अरुणा ढेरे या स्नेहमेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी कळवली आहे. अधिकाधिक प्राध्यापकांनी या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. जोशी यांनी केले आहे