"डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार प्रा. विलास खोले यांना जाहिर"

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जेष्ठ समीक्षक व व्यासंगी प्राध्यापक डॉ. विलास खोले यांना जाहिर झाला आहे. दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
बुधवार दि. १७ ऑगस्ट २०१६ रोजी सायं. ६.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा पुरस्कार डॉ. विलास खोले यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी कळवली आहे.