मसाप ब्लॉग  

"राजेंद्र खेर यांना युगंधर सन्मान"

August 26, 2016

 पुणे : 'मृत्युंजय' कार  शिवाजी सावंत यांच्या ७६ व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शिवाजी सावंत मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट रोजी आठवणीतील शिवाजी सावंत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध कादंबरीकार राजेंद्र खेर यांना युगंधर सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या सन्मानाचे स्वरूप आहे. संस्कृतच्या व्यासंगी अभ्यासक डॉ. सरोजा भाटे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात 'आधुनिक काळातही  ऐतिहासिक आणि पौराणिक विषयावरील  साहित्यकृतीकडे वाचकांचा अधिक ओढा का आहे?' या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात डॉ. सरोजा भाटे , राजेंद्र खेर, प्रा. मिलिंद जोशी, सहभागी होणार आहेत. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, शिवाजी सावंत मित्र मंडळाचे जयराम देसाई, अनिल कुलकर्णी, रमेश राठिवडेकर यांनी कळवली आहे. 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts